0
देशातील पहिली मेड इन इंडिया ट्रेन तयार झाली असून त्याचे नाव सध्या ट्रेन-१८ असे ठेवण्यात आले आहे. या ट्रेनची पहिली चाचणी पुढील आठवड्यात सुरु केली जाणार आहे. या ट्रेनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे यात कोणत्याही प्रकारचे इंजिन (लोकोमोटिव्ह) नाही. या एका ट्रेनच्या निर्मितीचा खर्च १०० कोटी इतका झाला आहे. 


चेन्नईतील इंट्रग्रील कोच फॅक्ट्री (ICF)चे जनरल मॅनेजर सुधांशु मनी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या ट्रेनची चाचणी पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. या ट्रेनची निर्मिती आयसीएफने तयार केले आहे आणि भारतीय रेल्वे देखील याची निर्मिती करणार आहे. 
यातील दुसरी ट्रेन मार्च २०१९पर्यंत तयार होईल अशी आहे. सुधांशु यांच्यामते जेव्हा अशा पद्धतीची दुसरी ट्रेन तयार करण्यास १०० कोटींपेक्षा कमी खर्च येईल. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रेनची निर्मिती शताब्दी-राजधानी सारख्या रेल्वे मार्गासाठी तयार करण्यात आली आहे. सध्या तरी याचा वापर दिल्ली-भोपाळ, चेन्नई-बेंगळुरु आणि मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवली जाणार. 
या ट्रेनचा वेग २२० इतका असेल. पण सुरुवातीच्या काळात त्याचा वेग १६० इतका ठेवला जाणार आहे. या ट्रेनमधील प्रत्येक कोचमध्ये ६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जे गरजेनुसार ३६० डिग्रीमध्ये फिरू शकतील.

Post a Comment

 
Top