0
 • Emotional Story of Dalbir who died in Amritsar Train Accidentशहरातील जोडा बाजार फाटकाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताने अवघ्या देशावर शोककळा निर्माण झाली आहे. दोन रेल्वेंनी लोकांनी चिरडल्याने 60 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर अनेक जखमी आहे. या सर्व कुटुंबांना प्रचंड वेदनांना सामोरे जावे लागत आहे. असेच एक कुटुंब म्हणजे दलबीर सिंग या तरुणाचे. शुक्रवारच्या अपघातात दलबीरचाही अंत झाला. कुटुंबाचा तो एकमेव आधार होता


  रामलिलेमध्ये बनला होता रावण 
  दलबिर सिंह हा अमृतसरचा रहिवासी होती. शुक्रवारच्या अपघातातील मृतांमध्ये त्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे शहरामध्ये झालेल्या रामलिला महोत्सवामध्ये दलबीर सिंग सहभागी झालेला होता. त्यातही योगायोग म्हणजे दलबीर सिंगने रामलिलेमध्ये रावणाची भूमिका साकारली होती. रामलिलेमध्ये दहा दिवस ज्या रावणाचे रुप लोकांसमोर आणले त्याचे दहन पाहतानाच दलबीरला दुर्दैवी मृत्यू आला.

  8 महिन्यांचे बाळ 
  शुक्रवारच्या अपघातात दलबीरचे निधन झाल्यानंतर त्याच्याबाबत आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दलबीरला काही महिन्यांपूर्वीच वडील होण्याचे सुख मिळालेले होते. त्याचे बाळ केवळ 8 महिन्यांचे असल्याची माहिती मिळाली आहे.

  सुनेला नोकरी द्या..
  दलबीरच्या आईने घटनेनंतर आक्रोश व्यक्त केला. कुटुंबाचा उदरनिर्वाह संपूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता. त्यामुळे आता तो गेल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दलबीरच्या पत्नीला म्हणजे सुनेला सरकारी नोकरी देण्याची मागणी दलबीरच्या आईने प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

 
Top