0गुरगाव: 
गुरगाव येथे शनिवारी झालेल्या गोळीबारातील त्या न्यायाधिशांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. मुलगा अजूनही अत्यंत गंभीर अवस्थेत असून जरी त्याला वाचविण्यात यश आले, तरी त्याला कोणतीही कायमची विकलांगता येऊ शकते अशी भीती डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधिश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलाला सुरक्षा रक्षकानेच गोळी मारली होती. दरम्यान, आरोपीला चार दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top