0

स्टॉकहोम - कर्करोगावरील उपचारासाठी संशोधन करणाऱ्या दोन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अमेरिकेतील जेम्स पी. एलिसन (70) आणि जपानचे तासुकू होंजो (73) यांनी शरीरातील ताकदीने कर्करोगाशी लढा कसा द्यायचा यावर संशोधन केले. त्यांच्या पद्धतीत कॅन्सरच्या ट्यूमरशी लढण्यास शरीरातील रोग प्रतिबंधक क्षमतेला आणखी मजबूत करता येईल. दोन्ही शास्त्रज्ञांना संयुक्तरीत्या 7.27 कोटी रुपयांचे (10 लाख डॉलर) बक्षीस दिले जाणार आहे.

Post a comment

 
Top