0
  • Accident in parola, 3 deadपारोळा - धुळे-जळगाव रस्त्यावर मोंढाळे गावाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने कार दिलेल्या धडकेत बापलेकासह एकाच कुटुंबातील तिघे ठार तर, चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी सुमारास घडली. मुन्नाभाई शेख, शेख हसनेन, हुमेरा अशी मृतांची नावे अाहेत. हे सर्व जण सूरतचे रहिवाशी अाहेत.

    मृतांचे नातेवाइक अरफाद खान यांनी सांगितले, त्यांची बहीण सय्यद सिरीनजी गरोदर असून तिच्या सातव्या महिन्याच्या खोळ भरण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही सुरत येथून पहाटे २ वाजता नशिराबादकडे जाण्यास दोन कारने निघालो. एका कारमध्ये काका मुन्नाभाई शेख (४६), वहिनी शहनाज बानो, चुलत बहीण सना (१३), मित्र जावेद व काकांची मुले शेख हसनेन व मुलगी हुमेरा बसले होते. दुसऱ्या कारमध्ये मी व भाऊ अश्रफ खान (१९) मित्र सोहेल खान, काकू सावेरा, भाऊ जुबेर शेख (२९) व भाची निगार (३) होतो. दोन्ही गाड्या सोबत होत्या. सकाळी आठ वाजता आम्ही धुळे शहर सोडल्यानंतर आमची कार मागे राहिली. यादरम्यान दळवेल पेट्रोलपंपाजवळ पहिल्या कारला समोरुन येणाऱ्या ट्रकने जाेरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार अक्षरश: हवेत उडाली. यात मुन्नाभाई शेख, शेख हसनेन हे दोघे जागीच ठार झाले. तर हुमेराचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर शहनाज खान अफजल, फरजाना शेख मुजीब, सना सय्यद हसीम शेख व आसीम शेख हे चौघे जण गंभीर जखमी झाले अाहेत. त्यांना बहादरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले.

Post a Comment

 
Top