नवी दिल्ली - अमेरिकेने बंधने लावल्यानंतरही भारत इराणसोबतचे व्यापारी संबंध कायम ठेवण्याची शक्यता आहे. यासंबंधीचे स्पष्ट संकेत शुक्रवारी मिळाले. सरकारी रिफायनरी
या उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) आणि मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडने (एमआरपीएल) नोव्हेंबरमध्ये इराणकडून १२.५ लाख टन तेल आयात करण्याचा करार केला आहे. इराणच्या तेलक्षेत्राविरोधात चार नोव्हेंबरपासून अमेरिकी बंधने लागू होणार आहेत. अशा परिस्थितीत रशियासोबत एस-४०० मिसाइल करारानंतर अशा प्रकारे भारताचा हा अमेरिकेला दुसरा झटका असेल. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याच वर्षी मे महिन्यात इराणवर बंधने लावण्याची घोषणा केली होती.कंपन्यांनी इराणकडून १२.५ लाख टन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी करार केला आहे. इतकेच नाही तर इराणला डॉलरमध्ये- मोबदला देण्याऐवजी रुपयामध्ये मोबदला देण्याची तयारी भारताने केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment