0
 घरात एकट्या असलेल्या डाॅक्टर महिलेचे हातपाय बांधून घरातून ५ लाख रुपये लुटून नेल्याची घटना जळगावातील नारायणी सोसायटीत घडली. पीडित डॉक्टराच्या घरातून घसघशीत रक्कम मिळेल, अशी चोरांना अपेक्षा होती. मात्र, पाचच लाख रुपये मिळाल्याने ‘आपण परवा पुन्हा येऊ’ अशी धमकी देऊन चोर निघून गेले.


डॉ. अचल निशाद पाटील असे पीडितेचे नाव आहे. त्यांचे पती डॉ. निशाद हे रुग्णालयात असताना सोमवारी रात्री अचल एकट्याच घरात होत्या. त्या वेळी चाेरट्यांनी दरवाजाची बेल वाजवून घरात प्रवेश करून अचल यांचे हातपाय बांधून टाकले. त्यामुळे अचल यांनी “पाहिजे ते घेऊन जा, पण आपल्याला जिवंत सोडा,’ अशी विनंती केली. अचल यांच्या सांगण्यावरून चोरांनी कपाटातील सुटकेसमधून ५ लाख रुपयांची राेकड, त्यांच्या बोटातील २५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी काढून घेतली. दरम्यान, त्यांना अचल यांच्या घरातून खूप रोकड आणि मुद्देमाल मिळण्याची अपेक्षा होती. परंतु कमी रक्कम मिळाल्याने त्यांनी परत येऊन रक्कम घेऊन जाऊ तसेच रक्कम न दिल्या पतीची हत्या करून टाकू, अशी धमकी चोरांनी डॉ. अचल यांना दिली.
अनभिज्ञ पतीजवळून गेले चोर, संशयिताचे रेखाचित्र जारी
डॉ. अचलला बांधून टाकल्यानंतर चोरांनी दाराला बाहेरून कडी लावली आणि निघाले. दरम्यान, जिना उतरताना डॉ. निशाद यांची चोरांशी नजरानजर झाली. परंतु ते घटनेसंदर्भात अनभिज्ञ असल्याने चोर निघून गेले. दार उघडल्यानंतर संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान, अचल यांनी वर्णन केल्याप्रमाणे एका चोराचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे.
woman tied their hands and legs and stopped the cash of Rs five lakhs

Post a Comment

 
Top