0
नंदुरबार- तळोदा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार उदयसिंग पाडवी यांची सावत्र बहीण राधा कोचरु पाडवी ‍यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तळोदा तालुक्यातील सोमावल येथे घडली. राधा यांनी सावत्र भाऊ अर्थात आमदार उदयसिंग पाडवी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. राधा यांच्या तक्रारीनंतर तळोदा पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

राधा पाडवी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. या आर्थिक विवंचणेतून राधा यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
वडिलोपार्जित जमीन व रॉकेलचे लायसन्स बळकावले...
आमदार उदयसिंग पाडवी यांनी त्यांच्या पदाचा वापर करत वडिलोपार्जित जमीन आणि रॉकेलचे लायसन्स बळकावले. तसेच सावत्र भाऊ-बहिणीला मालमत्तेत त्यांचा हिस्सा दिला नाही. उदरनिर्वाहासाठी इतर कोणतेही साधन नसल्याने आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे राधा पाडवी यांनी म्हटले आहे.
अनेकदा दाद मागितली पण न्याय मिळाली नाही...
वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्से वाटणीसंदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा दाद मागितली. जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार केली. तरीही आम्हाला न्याय मिळाला नसल्याचे राधा यांचा सख्खा भाऊ किसन पाडवी यांनी म्हटले आहे.BJP MLA Udaysing Padavis Step Sister Attempt to Suicide In Tadoda

Post a comment

 
Top