- मुंबई- गुजरात पाठोपाठ आता महाराष्ट्रातही उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुंबईतील प्रभा देवी परिसरात रस्त्यावर स्टॉल लावल्याने शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
विशाल पांडेय असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.मिळालेली माहिती अशी की, प्रभादेवी परिसरात विशालने रस्त्यावर फूड स्टॉल लावले होते. यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिल्याचे समजते. स्टॉलचीही तोडफोड करण्यात आली.दरम्यान, गुजरातमधील बनासकांठामध्ये 14 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश व बिहार येथून आलेल्या नागरिकांवर हल्ले करण्यात आले होते. हल्ल्यांनतर अनेक उत्तर भारतीय, बिहारी नागरिक हे गुजरात सोडून हजारोंच्या संख्येने आपल्या गावी गेली होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment