0
मुंबईः अभिनेत्री तनुश्री दत्ताने एका पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर आगपाखड केली आहे. राज ठाकरे स्वतःला लायक म्हणवून घेण्यासाठी जागोजागी तोडफोड करतात, असे तनुश्री म्हणाली. 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर तनुश्रीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, त्यावर ती बोलत होती. नाना पाटेकरांनी चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्यानंतर त्यांनी     मनसेच्या लोकांना बोलावून तिच्यावर हल्ला केल्याचा खुलासा तनुश्रीने केला आहे.
  • तनुश्री म्हणाली - बाळासाहेबांची खुर्ची मिळाली नाही, तर तोडफोड करु लागले राज ठाकरे 
    तनुश्री पत्रकार परिषदेत म्हणाली की, राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती. पण ती बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरेंना मिळाली. तनुश्री म्हणाली, "नालायक जेव्हा स्वतःला लायक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा फक्त तोडफोड होते. गुंडांना त्याने एकत्र आणले आणि आपला पक्ष बनवला. आता आपल्या गुंडांना पाठवून तो ठिकठिकाणी तोडफोड करतो. ज्यांना कुठे तोडफोड करायची असले, त्यांनी मनसेशी संपर्क साधायला हवा. बाळासाहेबांची खुर्ची न मिळाल्याची खंत त्याला आजही वाटत आहे. लीडर न झाल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. कुणीच तुला लीडर बनवणार नाही... कारण लोकांना सरकार राज नकोय. लीडर तो असतो, जो गरजू लोकांची, महिलांची सुरक्षा करतो. महिलांवर दबाव टाकत नाही आणि महिलांच्या गाडीवर हल्ला चढवत नाही.

    राज ठाकरे यांच्यावर तनुश्री दत्ताने आगपाखड केली आहे.

    • Tanushree Dutta Blasts On Raj Thackeray
  • "

 

Post a comment

 
Top