अकाेला- जिल्हाअंतर्गत बदलीप्रक्रियेसह इतरही प्रश्नांबाबत मंगळवारी मंत्रालयात ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील, जि.प.चे अधिकारी, शिक्षक समन्वय समितीत बैठक झाली. शिक्षकांचे प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडवणार असून, गैरसोयीच्या ठिकाणच्या शिक्षिकांच्या बदल्या रद्द करुन त्यांना साेयीच्या ठिकाणी पद स्थापना देेणार अाहे. याबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
जि. प. तील मराठी, उर्दूच्या २२९० शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या हाेत्या. या बदल्या संवर्ग १ व २ मध्ये करण्यात अाल्या. मात्र काही शिक्षकांची खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली केल्याचा अाराेप शिक्षकांनी केला हाेता. याबाबतच्या लढा उभारण्यासाठी समन्वय समितीची स्थापन केली. ९ अाॅक्टाेबरला मंत्रालयात शिक्षकांच्या प्रश्नांवरील बैठकीत ताेडगा निघाला. बैठकीला शिक्षकांच्या समस्या मांडणी करणारे राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, राज्य शिक्षक संघाचे संजय भाकरे, म. रा. उर्दू शिक्षक संघटनेचे जव्वाद हुसेन, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे संतोष महल्ले, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शशिकांत गायकवाड, प्रमोद काळपांडे, म. रा. शिक्षक समितीचे नामदेवराव फाले, बहुजन शिक्षक महासंघाचे एम. एम. तायडे, शिक्षक सेनेचे देवानंद मोरे,प्राथमिक शिक्षक संघाचे विजय भोरे, नितीन बंडावार, अ. भा. शिक्षक संघाचे रजनीश ठाकरे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे रामदास वाघ उपस्थित होते.
तिसऱ्यांदा मिळाला मुहूर्त
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात ग्राम विकास मंत्री, अधिकारी व शिक्षकांच्या बैठकीसाठी पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी प्रयत्न केले. पहिल्यांदा बैठक ११ सप्टेंबर राेजी अायाेजित करण्यात अाली हाेती. मात्र काही कारणास्तव ही बैठक १८ सप्टेंबर राेजी घेण्याचा निर्णय झाला. मात्र त्यानंतरही गत आठवड्यात ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिव गुप्ता यांच्या उपस्थितीत सभा झाली हाेती. त्यानंतर ९ अाॅक्टाेबरला बैठक यशस्वी झाली.
हे प्रश्न निघणार निकाली
मंत्रालयातील बैठकीत पुढील प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग माेकळा झाला. विषय शिक्षकांच्या ५८३ पदे भरणार असून, समुपदेशन प्रक्रिया राबवणार अाहे. रॅडम राऊंडमध्ये शिक्षकांच्या बदल्या झाल्या अाहेत. विषय शिक्षकांच्या नियुक्तीनंतर हाेणाऱ्या समायोजनात या शिक्षकांना समाविष्ट करुन घेणार अाहे. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची ३८, केंद्र प्रमुखांची ३४, विस्तार अधिकाऱ्यांची १८ पदे रिक्त अाहेत. ही पदे पदोन्नती भरणार अाहेत.आंतरजिल्हा बदलीने अालेल्या शिक्षकांना परत न पाठवता त्यांना याेग्य वेळी सामावून घेणार अाहे. मासिक वेतनाला विलंब झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार अाहे. निवड श्रेणीबाबत चर्चा केली. अंशदायी पेन्शन योजनेत कपातीचे वितरण मिळणार अाहे. तशा सूचना िज. प. अधिकाऱ्यांना देण्यात अाल्या.
Post a Comment