पुणे- शिवाजी नगर रेल्वे स्टेशनच्या समोरील सिग्नलवर लोखंडी फ्लेक्स कोसळून दोघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ती म्हणजे, समृद्धी (17) आणि समर्थ (4) या दोन भावंडांनी उरला-सुरला आधारही गमावावा लागला आहे.
या घटनेतील मृतांमध्ये शिवाजी देविदास परदेशी (वय-40) यांचा समावेश आहे. ते रिक्षाचालक होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कालच (गुरुवार) शिवाजी परदेशी यांची पत्नी प्रीती यांचे केईएम हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अस्थी विसर्जन करण्यासाठी शिवाजी परदेशी हे स्वतः त्यांची आई, आत्या, दोन मुलांसोबत आळंदीला गेले होते. अस्थी विसर्जनानंतर ते पुण्याकडे परतत असताना त्यांच्या रिक्षावर लोखंडी फ्लेक्स कोसळले. यात शिवाजी परदेशी यांचा मृत्यू झाला.
शिवाजी परदेशी हे मागील अनेक वर्षांपासून नाना पेठ भागात राहात होते. या अपघातामुळे परदेशी कुटुंबावर 48 तासांत दुसर्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात परदेशी यांना दोन मुले, आई, आत्या किरकोळ जखमी झाल्या आह
Post a comment