0
  • मालेगाव- मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय व समाजात बदनामी हाेण्याच्या भीतीमुळे जन्मदात्या अाईनेच मुलीच्या जेवणात झाेपेच्या तब्बल २० गाेळ्या मिसळल्या, वडिलांनी हातपाय दाबून ठेवले तर निर्दयी चुलतभावाने थंड डोक्याने सतरा वर्षीय नेहाचा गळा अावळून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. साेमवारी (दि. २) मध्यरात्री घडलेल्या या घटनेतील मृत तरुणीच्या संशयास्पद मृत्यूचा पाेलिसांना निनावी फाेन अाल्यामुळे त्यांनी मुलीच्या नातेवाइकांच्या विरोधानंतरही सरणावरील मृतदेह थेट शवागृहात हलविल्याने अाॅनर किलिंगचा प्रकार गुरुवारी (दि. ४) उघडकीस आला. याप्रकरणी वडील शरद सखाराम चाैधरी, अाई सुनीता शरद चाैधरी व चुलतभाऊ नीलेश मधुकर चाैधरी या संशयितांना छावणी पाेलिसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला अाहे.


    कलेक्टरपट्टा भागातील इंद्रायणी काॅलनीत राहणाऱ्या नेहा शरद चाैधरी या तरुणीचा साेमवारी मध्यरात्री मृत्यू झाला हाेता. कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी अंत्ययात्रा काढून श्रीरामनगर अमरधाममध्ये पार्थिव अाणले. पार्थिव सरणावर ठेवून अग्निडाग देण्याची तयारी सुरू असतानाच छावणी व कॅम्प पाेलिसांचे पथक तातडीने स्मशानभूमीत पाेहाेचले. त्यांनी संशयास्पद मृत्यूचा निनावी फाेन अाल्याची माहिती देत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवावा लागेल असे सांगितले. पाेलिसांच्या या भूमिकेस नातेवाइकांनी विराेध करून ज्याने फाेन केला त्याला समाेर अाणा असा पवित्रा घेतला. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला हाेता. पाेलिसांनी कठाेर कायद्याची भाषा वापरल्याने नातेवाइकांचा विराेध मावळला व सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. या घटनेची प्राथमिक अकस्मात मृत्यूची नाेंद करून पाेलिसांनी तपास सुरू केला हाेता.

    तपासात अाई, वडील व चुलतभाऊ यांनी दिलेल्या मृत्यूच्या कारणात एकवाक्यता नसल्याने पाेलिसांचा संशय अधिकच वाढला. अखेर पुरावे समाेर येऊ लागल्याने अाई-वडिलांचे अवसान गळाले व त्यांनी मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने तिला संपविल्याची कबुली दिली. पाेलिसांनी नेहासाेबत फिरण्यास गेलेल्या चार अल्पवयीन मुलांनाही चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहे. पाेलिस उपनिरीक्षक राहुल पाटील यांच्या फिर्यादीनुसार दाखल खुनाच्या गुन्ह्याचा तपास कॅम्प विभागाचे पाेलिस उपअधीक्षक अजित हगवणे करत अाहेत.

    पाेलिसांची तत्परता
    एका निनावी फाेनची दखल घेत पाेलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे खुनाचा छडा लागला. स्मशानभूमीत पाेहाेचण्यास दहा मिनिटांनी उशिरा झाला असता तरी नेहाचे पार्थिव मिळाले नसते. पाेलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून संशयितांना तत्काळ ताब्यात घेतल्याने पाेलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे काैतुक हाेत अाहे.

    झोपेच्या गाेळ्यांच्या संख्येत केला बदल 
    सुनीता चाैधरी हिने एका डाॅक्टरकडे जाऊन झाेपेच्या गाेळ्यांची मागणी केली हाेती. डाॅक्टरांनी चिठ्ठीवर दाेन गाेळ्या लिहून दिल्या हाेत्या. मात्र, सुनीताने चिठ्ठीवरील दाेनच्या अाकड्यापुढे शून्य लिहून हा अाकडा वीस करून घेतला. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत हा प्रकार उघड झाला. अाैषधविक्रेत्याने २० गाेळ्या दिल्याचा जबाब नाेंदविला अाहे.

    थंड डाेक्याने केले हत्येचे नियाेजन 
    नेहाचा २ अाॅक्टाेबरला वाढदिवस असल्याने ती काही मित्रांसह चंद्रेश्वरी येथे फिरण्यास गेल्याची माहिती अाहे. तिचे प्रेमसंबंध असल्याचे कुणीतरी वडिलांच्या निदर्शनास अाणून दिले. संतापल्याने शरद चाैधरी याने पत्नी सुनीताला झाेपेच्या गाेळ्या अाणण्यास सांगितले. तब्बल वीस गाेळ्या नेहाला जेवणातून देण्यात अाल्या. गाेळ्यांमुळे नेहा काही वेळातच झाेपी गेली. वडील शरद याने पुतण्या नीलेश चाैधरीला फाेन करून घरी बाेलावून घेतले. यानंतर अाईने हात, वडिलांनी पाय दाबून ठेवले तर नीलेशने पूर्ण ताकदीनिशी नेहाचा गळा अावळून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नेहाला पुसटशी कल्पनाही येणार नाही याची खबरदारी घेत अगदी शांत डाेक्याने अाई-वडिलांनीच हत्येचे नियाेजन केले हाेते.

    नैसर्गिक मृत्यू भासविण्याचा प्रयत्न 
    नेहाचा खून केल्यानंतर तिचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात अाला. तिचे डाेके दुखत हाेते, हातपायांना पीळ पडत हाेता अशी माहिती कुटुंबीयांनी दिली हाेती. तसेच तिला शहरातील काही खासगी रुग्णालयात नेल्याचेही सांगितले हाेते. परंतु, पाेलिसांनी संबंधित सर्व रुग्णालयांत जाऊन विचारणा केली असता तिचा अगाेदरच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तिच्यावर उपचार झालेच नाही असे सांगितल्याने सत्य समाेर अाले.

    कलेक्टरपट्टा भागातील इंद्रायणी काॅलनीत राहणाऱ्या नेहा शरद चाैधरी या तरुणीचा साेमवारी मध्यरात्री मृत्यू झाला हाेता.

    • honor killing in Malegaon Nashik, Mother and Father killed his Daughter

Post a Comment

 
Top