0
 • Sexually Abusing Minor Girl in thaneमुंबई- ठाण्यातील अडीच वर्षीच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणार्‍या आरोपीला मनसैनिकांनी पत्रकार परिषदेत आरोपीला चांगलाच चोप दिला. आरोपी हा बिहारचा आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकत्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला चोप दिला.

  काय आहे हे प्रकरण...?
  आरोपी 53 वर्षीय असून तो बिहारचा आहे. तो टेंपो चालवतो. आरोपीने अडीच वर्षीय मराठी मुलीशी अश्लील चाळे केले होते. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल होत होता. त्याला मनसे कार्यकर्त्यांनी पकडल्याचे अविनाश जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.
  अन्यथा मनसे स्टाईल..
  परप्रांतीय विकृतांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने कारवाई करेल, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला.
  संजय निरुपम ही घाण...
  काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासारख्यांना महाराष्ट्रातून हकलायला हवे. संजय निरुपम ही घाण आहे. मराठी आणि यूपी बिहारींच्यात वाद करुन राजकारण करायचे, हा त्यांचा धंदा आहे. मराठी माणसांनी एकत्र येऊन संजय निरुपमांना हाकलावे, असेही अविनाश जाधव यांनी आवाहन केले.
  मुलीवरील अत्याचारानंतर गुजरातेत यूपी-बिहारींवर 5 दिवसांत 42 हल्ले
  दरम्यान, गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात 14 महिन्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर गुजरातमध्ये यूपी-बिहारी लोकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत 42 परप्रांतीयांवर हल्ले झाले. त्यामुळे तब्बल 8000 लोकांनी जीव मुठीत धरून या राज्याबाहेर पलायन केले. परप्रांतीयांवर संतापाचे पडसाद मेहसाना, साबरकांठा, अहमदाबाद (ग्रामीण), अहमदाबाद (शहर), अरावली, पाटण, गांधीनगर या भागात मोठ्या प्रमाणावर उमटले. हल्ले करणाऱ्या 342 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
  सोशल मीडियावर अफवा पसरवून हिंसाचार घडवल्याप्रकरणी 70 लोकांवर गुन्हे दाखल करून सात जणांना अटक करण्यात आली. हल्ले घडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये परप्रांतीयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जारी केले असून एसआपीच्या 17 कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत. यूपी-बिहारी लोक राहत असलेल्या वस्त्यांमध्ये व काम करत असलेल्या कंपन्यांमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. गुजरातचे गृह राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी रविवारी सायंकाळी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हल्लेखोरांना सहजपणे जामीन मिळणार नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. साबरकांठाजवळील हिंमतनगरमध्ये 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते. या प्रकरणात आरोपी असलेल्या एका बिहारी युवकाला पोलिसांनी अटक केली होती. या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांना राज्याबाहेर काढण्यासाठी गुजरातेत आंदोलने सुरू झाली आहेत

Post a Comment

 
Top