0
सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिलेल्या सुचनेनुसार सातारा जिह्यात मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. त्याच अभियानातंर्गत रविवारीही मतदार नोंदणी अभियान सुरु होते. सातारा शहरात मतदार नोंदणी केंद्रावर हे अभियान सुरु आहे की नाही यासाठी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी भेटी देवून बीएओंचे कौतुक केले. सातारा तालुका हा जिह्यातील 11 तालुक्यात सरस ठरला आहे. तालुक्यात 8 हजार 171 मतदारांनी आपले अर्ज भरुन दिले आहेत. रविवारीही चांगली नोंदणी झाली.
सातारा जिह्यात येवू घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला कोणीही मतदानापासून वंचित राहू नये. मतदान हा मुलभूत हक्क असल्याने तो मिळावा याकरता जिह्यात मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. या अभियानात सातारा तालुक्यात मतदार नोंदणी अभियान सक्षमपणे राबवण्यात आले आहे. त्याबाबत तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आज शेवटचा रविवार असल्याने आम्ही सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी केंद्रांना भेटी दिल्या आहेत. पर्यवेक्षकांकडून माहिती घेतली आहे. सकाळी सुपरव्हायझरांची बैठक घेतली. त्यांना सुचना दिल्या आहेत. बीएलओंना याद्या दिल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांग मतदारांना यादीमध्ये टॅग केले जाणार आहे. जेणेकरुन कोणत्या केंद्रावर किती दिव्यांग आहेत. हे आम्हाला दिसणार आहे. त्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर आणणे आणि नेवून सोडणे ही सगळी जबाबदारी प्रशासनावर आहे. प्रत्येक मतदान पेंद्रावर माहिती गोळा केली जात आहे. मतदार यादीत नोंद केली जात आहे. ते फक्त आम्हाला काढता येणार आहे. व्हीआयपी मतदार आहेत. आमदार, खासदार, जज, वकील यांची नाव तपासून घेतली आहेत. वेगळय़ा क्षेत्रातील चुकून वगळली जावू नयेत, याची काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

 
Top