- दुबई - क्रिकेटच्या विश्वातील कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत अाणि पाकिस्तान अाता अाशिया चषकातील सामन्यात अाज रविवारी पुन्हा समाेरासमाेर असतील. अाता सलग दुसऱ्या सामन्यातही अापल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकला धूळ चारण्यासाठी राेहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने कंबर कसली. गत सामन्यात भारताने पाकवर मात केली हाेती. अाता हे दाेन्ही संघ पुन्हा झुंजणार अाहेत. सलगच्या तीन विजयांनी भारतीय संघ जबरदस्त फाॅर्मात अाहे. यातून अाता या सामन्यातही भारताचे विजयाचे पारडे जड मानले जाते.बांगलादेशविरुद्ध झालेल्या गत सामन्यात भारताच्या युवांनी सरस खेळी केली. जखमी हार्दिकच्या जागी खेळण्याच्या मिळालेल्या संधीचे रवींद्र जडेजाने साेने केले. त्याने निवड समितीचा हा विश्वास यशस्वीपणे सार्थकी लावला. स्वत:ला सिद्ध करताना त्याने चार विकेट घेतल्या. यासह त्याने विक्रमालाही गवसणी घातली. कारण, याच संघाविरुद्ध दाेन वेळा चार विकेट घेणारा जडेजा हा भारताचा पहिलाच गाेलंदाज ठरला. भुवनेश्वर कुमार अाणि जसप्रीत बुमराहनेही धारदार गाेलंदाजी करताना बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला.२००८ नंतर पुन्हा दाेन सामने : अाशिया चषकात यंदा भारताला एकाच स्पर्धेत दाेन सामन्यांत पाकविरुद्ध मैदानावर उतरावे लागत अाहे. असाच याेग अाता तब्बल दहा वर्षांनंतर जुळून अाला अाहे. यापूर्वी, २००८ मध्येही अाशिया चषकात या दाेन्ही संघांमध्ये दाेन सामने झाले हाेते. यादरम्यान दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका सामन्यात विजयाची नाेंद केली.राेहित शर्मावर सर्वांची नजर
सलगच्या दाेन अर्धशतकांच्या बळावर अाता टीम इंडियाचा कर्णधार राेहित शर्मा जबरदस्त फाॅर्मात अाला अाहे. अाता पुन्हा एकदा पाकविरुद्ध अर्धशतक ठाेकण्याचा त्याचा मानस अाहे. त्याने बुधवारी पाकविरुद्ध (५२) अाणि शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध (नाबाद ८३) शानदार अर्धशतक ठाेकले. त्यामुळे त्याला अाता तिसऱ्या अर्धशतकाचा विश्वास अाहे. त्याची पाकिस्तानविरुद्ध सामन्यातील कामगिरीही लक्षवेधी ठरलेली अाहे. ताे या संघाविरुद्ध अधिक माेठ्या अावेशात खेळताना दिसताे. याचा प्रत्ययही त्याने बुधवारी अाणला. त्याची या सामन्यातील कामगिरीही महत्त्वपूर्ण ठरली. त्याला साथही तशीच मिळाली. अाता पाकविरुद्ध सरस खेळीचा ही लय कायम ठेवण्यासाठी ताे उत्सुक अाहे.संभाव्य संघ
भारत : राेहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंग धाेनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.
पाकिस्तान : सर्फराज अहमद (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, बाबर अाझम, शाेएब मलिक, अासिफ अली, शादाब खान, माे. नवाज, हसन अली, शाहिन अाफ्रिदी, मोहम्मद अामीर.विजयाने थेट फायनलमध्ये
भारतीय संघाला अाता विजयी चाैकाराच्या बळावर स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेशाची संधी अाहे. या सामन्यातील विजेत्याचा थेट अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित हाेईल. भारताने सलग तीन सामन्यांत विजय संपादन केले अाहेत. मात्र, पाकिस्तानला एका पराभवासह दाेन विजयांची नाेंद करता अाली. या सामन्यातील पराभवाने पाकच्या अंतिम फेरीतील प्रवेशाच्या अाशा कायम राहतील. त्यामुळे पराभूत संघाला पुन्हा एकदा फायनलमधील प्रवेशाची संधी मिळणार अाहे.भारतीय संघाला अाता विजयी चाैकाराच्या बळावर स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेशाची संधी अाहे. विजेता फायनलमध्ये पोहोचेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment