0
विशाखापट्टनम - तितली चक्रीवादळ आज सकाळी ओडिशाच्या गंजम जिल्ह्याच्या गोपालपूर आणि आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलमच्या किनाऱ्यावर 140 ते 150 किलोमीटर ताशी वेगाने धडकले. त्यामुळे या किनारी भागात वेगवान वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचेही वृत्त आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तसेच वीजेचे खांब कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हे चक्रीवादळ अतिगंभीर श्रेणीतील आहे. जोरदार पावसाच्या इशाऱ्यानंतर ओडिशातील किनारपट्टी भागातील जिल्ह्यांतील काही भाग रिकामा करण्यात आला आहे.
हे वादळ 280 किलोमीटर लांब बंगालच्या खाडीमध्ये उठले होते. याचा परिणाम म्हणून 12 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण ओडिशामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यादरम्यान समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. ओडिशा सरकारने चक्रीवादळाचा आवाका पाहता 18 जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
ताशी 150 किमी वेगाने वाहत आहेत वारे
हवामान विभागाने बुधवारी इशारा दिला होता की, गुरुवारी ओडिशाच्या गोपालपूर, आंध्रच्या कलिंगापट्टनममध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. यादरम्यान ताशी 150 किमी वेगाने वारे वाहू शकतात. तितलीचा परिणाम पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांतही पाहायला मिळेल.

Post a Comment

 
Top