0
  • murder of Congress Worker over controversy on facebookमुंबई - राजकाणारासाठी सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरच एकमेकांवर भिडत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. विशेषतः काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर अनेक वाद होताना पाहायला मिळतात. अशाच एका वादाने मुंबईत एका काँग्रेस कार्यकर्त्याचा बळी घेतला आहे. मनोज दुबे असे या कार्यकर्त्याचे नाव असून भाजप कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हत्येचा संशय असलेले भाजप कार्यकर्ते आणि मनोज दुबे यांची एकमेकांची ओळख होती, असेही समोर येत आहे.


    यासंपूर्ण घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, एका युवकाने रविवारी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्याविरोधात किंवा त्यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट फेसबूकवर शेअर केली होती. पण त्यानंतर फेसबूकवरच वाद सुरू झाला. हा वाद प्रचंड विकोपाला गेला. काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांचाही या वादामध्ये सहभाग होता. त्यानंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास मनोज दुबे यांची हत्या झाल्याचे समोर आले. घाटकोपरच्या असल्फा भागामध्ये ही हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनोज दुबे आणि संशयित आरोपी एकमेकांना ओळखत होते, असेही समोर आले आहे

Post a Comment

 
Top