- अाैरंगाबाद - राज्यासह देशात निवडणुकांचा हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. राजकारणाचा 'खेळ' रंगण्याआधीच भाजपने खेळाच्या मैदानावर राजकीय चषकाचा नवा 'डाव' मांडला आहे. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांत ३० अाॅक्टाेबर २०१८ ते १२ जानेवारी २०१९ दरम्यान 'सीएम चषक' क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. शहरी भागात वाॅर्डनिहाय स्पर्धाही घेण्याचे नियोजन आहे. त्याची धुरा नगरसेवकांवर असेल. या महाेत्सवाच्या माध्यमातून तरुणाई व नवमतदार अापल्याकडे वळवून घेण्याची ही खेळी असल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबतची कोणतीही ठाेस रूपरेषाच मिळालेली नसल्याने क्रीडा संचालकांंपासून जिल्ह्यातील क्रीडा अधिकारीही पेचात सापडले.
क्रीमंत्र्यां
क्रीडामंत्रीच अनभिज्ञ : महाराष्ट्रात काेणता खेळ अधिक खेळला जाताे, काेणत्या खेळात युवा खेळाडूंची संख्या अधिक असते, राज्याचा मूळ खेळ काेणता या साऱ्या बाबतीत क्रीडामंत्री विनाेद तावडे अनभिज्ञ असल्याचे दिसतात.आयोजन खासगी, पत्र क्रीडा अधिकाऱ्यांना
स्पर्धेच्या अायाेजनाबाबत क्रीडा अाणि युवक कल्याण संचालनालयाच्या क्रीडा अायुक्तांसह उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी अद्यापही पेचात अाहे. त्यांना याच्या अाखणीबाबतची काेणत्याही प्रकारची माहिती नाही. केवळ स्पर्धा यशस्वीपणे राबवण्याचे पत्र त्यांना देण्यात अाले अाहे. यामुळे अधिकारी वर्गातून नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र आहे.
जातनिहाय खेळाडूंची माहिती मागवली
अाॅनलाइन नावनाेंदणीत खेळाडूंना वैयक्तिक माहितीसह शहराचे नाव व आपल्या मतदारसंघाचीही माहिती द्यावी लागेल. त्यातच समांतर स्पर्धांत सहभागी हाेणाऱ्या खेळाडूंची जातनिहाय माहिती अंतर्गतपणे मागवण्यात अाली अाहे. काेणत्या क्रीडा प्रकारात किती अाणि काेणत्या जातीचे खेळाडू सर्वाधिक संख्येत सहभागी हाेतात याची माहिती २ दिवसांत क्रीडा संचालकांना द्यावी लागणार अाहे.
प्रत्येक वाॅर्डात स्पर्धा : शहरी भागातील प्रत्येक वाॅर्डात अायाेजनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अाहे. आयोजनाची सर्वताेपरी जबाबदारी संबंधित नगरसेवकांवर असेल. नगरसेवक हे स्थानिक क्रीडा अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून स्पर्धा घेतील.
मोठे प्रश्नचिन्ह, उत्तरे काेणाकडे?
स्पर्धेत वयाेगट काेणता? अार्थिक बजेट किती? रूपरेषा काय? कुठे हाेणार स्पर्धा? किती मैदानांवर? अायाेजन, खर्च किती? खर्च काेण करणार? सहभागी खेळाडूंची संख्या किती? किती संघांचा समावेश ? पंचाची व्यवस्था काेण करणार? क्रीडा साहित्याचे काय?
अशी असेल मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धा
- ५० लाखांची बक्षिसे
- १ हजार ७३ चषक
- ८६,४५१ एकूण पदके
- मुख्यमंत्र्यांचे प्रमाणपत्र
या खेळांचा समावेश :
क्रिकेट, खाे-खाे, कबड्डी, व्हाॅलीबाॅल, अॅथलेटिक्स, कुस्ती, कॅरम अादी.डा - नी युवा गट नाकारला, १८ वर्षांवरील खेळाडू : क्रीडा महाेत्सवामध्ये अधिक युवा खेळाडू सहभागी व्हावेत यासाठी जाेरदार प्रयत्न केला जात अाहे. यासाठी बैठकीत क्रीडा अधिकाऱ्यांनी युवांच्या १२, १४ अाणि १६ वर्षांखालील वयाेगटात स्पर्धा घेण्याचे सुचवले हाेते. मात्र, खुद्द क्रीडामंत्री विनाेद तावडे यांनी हा युवा गट नाकारला. तसेच या स्पर्धेत १८ वर्षांखालील खेळाडू माेठ्या संख्येत सहभागी व्हावे, अशी स्पष्ट ताकीदच दिली अाहे. नवा मतदार जाेडण्यासाठीच हा अट्टहास केला जात असल्याची अधिकाऱ्यांची अाेरड अाहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment