0
  • Tiger Killed one more man in Amaravati districtवाघाने केलेल्या हल्ल्यानंतर आढळलेला वाळके यांच्या शरिराचा भाग.
    अमरावती - येथे वाघाने आणखी एक बळी घेतल्याचे समोर आले आहे. धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगा येथील मोरेश्वर वाळके यांचा मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. वाघाचे त्यांचे शरीर अक्षरशः छिन्न विछिन्न करत त्यांच्या शरिराचे तीन तुकडे केल्याचे आढळून आले.


    दुपारीच चार वाजेच्या सुमारास वाळके हे बकरीला चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्ला. वाघिणीने वाळके यांच्या शरिराचे अक्षरशः तीन तुकडे केले आहेत. राठी यांच्या शेताच्या जवळ असलेल्या नाल्यामध्ये वाळके यांचा मृतदेह आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वीच या परिसरात वाघाने एक बळी घेतला होता. त्यामुळे वाळके यांचा दुसरा बळी ठरला आहे.

    वेगवेगळ्या ठिकाणी दिसले शरिराचे तुकडे 
    वाघाने वाळके यांच्यावर एवढा भीषण हल्ला केल्याचे समोर आले आहे की, त्यांच्या शरिराचे तीन तुकडे झाले होते. हल्ला केलेल्या ठिकाणाच्या आसपास शरिराचे हे तुकडे आढळून आले. त्यात त्यांचे शीर एकाठिकाणी कमरेखालचा भाग (पाय) दुसरीकडे आणि शरिराचा तिसरा भाग एकाठिकाणी आढळून आले. अत्यंत वाईट असे हे दृश्य होते. 

Post a Comment

 
Top