0

  • Vidarbha is different if it is unanimous: Ravsaheb Danweवर्धा - भारतीय जनता पक्ष हा राज्यभरात सध्या क्रमांक एकचा पक्ष असून, मागील काळात लढवलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपने विजय संपादन केलेला आहे. अजेंड्याप्रमाणे बोलायचे तर वेगळ्या विदर्भासाठी एकमत असेल तर त्याचा निर्णय घेता येऊ शकतो, असे आश्वासनवजा मत मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे.


    लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात सुरू असलेल्या तर्कविर्तकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
    आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्या निमित्ताने ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर दानवे वर्ध्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत म्हणाले, मागील ४ वर्षांत पार पडलेल्या जवळपास सर्वच निवडणुकांतमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे सध्या भाजप क्रमांक एकवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात भाजपचे ५ हजार सरपंच आहेत. शिवाय, राज्यातील ८१ नगर परिषदा, १५ नगरपालिका, १२ जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा आहे. यासाठी निवडणूककाळात प्रत्येक ९२ हजार बूथप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षातील सर्व कार्यकर्ते कामाला लागले असून या निवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा आशावादही खासदार दानवे यांनी व्यक्त केला.

    सर्व आश्वासने पूर्ण केली
    मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने जनतेला दिलेल्या आश्वासनांतील सर्व कामे मार्गी लागली अाहेत. राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफ, शेतमालाला हमीभाव देण्यात आला आहे. प्रत्येकाला आरोग्यासाठी ५ लाख देण्याचे ठरवले आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी खासदार रामदास तडस, आनंद अडसड, समीर कुणावार, दादाराव केचे, अनिल बोंडे, रामदास आंबटकर व राजेश बकाने उपस्थित हो

Post a Comment

 
Top