कर्नाटक - कर्नाटकाच्या देवानागरेमध्ये एका महिलेने बँक मॅनेजरला लाथाबुक्क्यांनीच नव्हे, तर दांडक्याने चोप देऊन धडा शिकवला. या घटनेचा चकित करणारा व्हिडिओ समोर आला आहे. महिलेने या मॅनेजरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
असे आहे प्रकरण
महिलेच्या आरोपांनुसार, मॅनेजरने लोन मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली होती. यामुळे संतप्त होऊन महिलेने बँक मॅनेजरवर हल्ला चढविला.
वृत्तसंस्थेनुसार, हा व्हिडिओ 15 ऑक्टोबरचा आहे. मॅनेजर स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु महिला थांबत नाही. आधी दांडक्याने, मग लाथाबुक्क्यांनी आणि मग चप्पल काढून त्याच्यावर वार करते. व्हिडिओ महिला आरोपीची कॉलर पकडून त्याची धुलाई करताना दिसत आहे. एका रिपोर्टनुसार, आरोपी मॅनेजरचे नाव देवैया असून तो डीएचएफएल लोन एजन्सीमध्ये कार्यरत आहे.महिलेने कथितरीत्या 2 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. त्याबदल्यात आरोपी मॅनेजरने शारीरिक संबंधांची मागणी केली.
सोशलवर व्हायरल झाला व्हिडिओ...
जवळपास 50 सेकंदांच्या या व्हिडिओ फुटेजला सोशल साइटवरही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तथापि, अनेकांनी कॉमेंट करत निष्कर्ष न काढण्याचा सल्ला दिला आहे.
तथापि, काही जणांनी या महिलेला महिलेला सध्या सुरू असलेल्या #MeToo चळवळीची खरोखरीची योद्धा ठरवले आहे. अनेकांनी या महिलेच्या धाडसाचे कौतुकही केले आहे.
तथापि, देशभरात सध्या सोशल मीडियावर मीटू आंदोलन सुरू आहे. यामाध्यमातून महिला सतत आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या शेअर करत आहेत.
Post a Comment