बीड - बालपणी वडिलांनी आणलेल्या पुस्तकात योगक्रियांची चित्रे पाहिली. त्यातून योगाची आवड निर्माण झाली व योगाचा सराव सुरू केला. खेळात करिअर करायचे होते; परंतु हलाखीच्या स्थिती अडसर ठरली. मात्र, केवळ जिद्दीच्या बळावर भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळवला अन् सैन्य दलाकडून खेळताना योगा स्पोर्ट््स एशियन चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. ही कामगिरी केली आहे सोमणवाडी (ता.अंबाजोगाई) या छोट्याशा गावातील संदीप अंगद चाटेने.
जेमतेम स्थिती असलेल्या कुटुंबात संदीपचा जन्म झाला. वडील कुस्ती पटू असल्याने खेळाविषयी आत्मीयता. चौथीत असताना वडिलांनी आणलेल्या योग क्रियांची सचित्र माहिती देणाऱ्या पुस्तकाने संदीपच्या मनात रुची निर्माण केली. मग काय, वेळ मिळेल तेव्हा संदीप योगाभ्यास करत असे. सुदैवाने सन २००७ मध्ये चंद्रपूर येथे एका कार्यक्रमात लहानग्या संदीपला योगासने सादर करताना रामदेवबाबांनी पाहिले. त्याचे कौशल्य पाहून रामदेवबाबांनी हरयाणातील गुरुकुलात सहावी ते दहावी शिक्षणाची सोय केली. येथे संदीपला योगाचा बारकाईने अभ्यास झाला. योगात करिअर करायचे होते. मात्र हलाखीची स्थिती असल्याने संदीपला शालेय शिक्षणानंतर गावी यावे लागले. धर्मापुरी येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला. याचवेळी डिसेंबर २०१५ रोजी उस्मानाबाद येथील भरतीतून संदीप भारतीय सैन्य दलात रुजू झाला.पुतळा बनावे लागतेमल्लखांब, योग क्रियांची आवड होती. मोठ्या जिद्दीने व संघर्षातून राष्ट्रीय व खंड स्तरावरील योग स्पर्धेत यश मिळवले. प्रत्येक आसन सादर करताना दीड मिनिटांसाठी पुतळा बनून राहावे लागते. आता विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळायचे आहे. या यशात प्रवीणकुमार, रमेशकुमार मलिक, सुभाष, ऋषभ दांगडा यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. - संदीप चाटे, सोमणवाडी, ता. अंबाजोगाई.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment