मुंबई- मुंबईतील नालासोपारा येथील एका भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच हे हत्याकांड झाले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रूपाली चव्हाण (३२) असे मृत महिलेचे नाव आहे.
रूपाली चव्हाण या भाजप युतीच्या वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांना एका ठिकाणी चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
ला आहे.
Post a Comment