0
  • Acharya Bhagwant Maharaj tried to commit suicide by poisoningगेवराई- भाटेपुरी पंचमुखेश्वर संस्थानचे आचार्य भगवंत महाराज पुरी यांच्या जीपवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी रात्री गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाट्याजवळ घडली. या प्रकाराने व्यथित होऊन शुक्रवारी सकाळी महाराजांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बीडला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


    पंचमुखेश्वर संस्थानावर भगवंत महाराज पुरी आणि महादेव महाराज पुरी या दाेन गाद्या आहेत. यातील भगवंत महाराज गुरुवारी जीपने अर्धमसला येथे राधेशाम महाराज राऊत यांच्या घरी भजनासाठी गेले होते. चालक सचिन चव्हाण व भगवंत महाराज रात्री ११ वाजता भाटेपुरीकडे परतत असताना अर्धमसलाजवळ अज्ञात लोकांनी त्यांच्या जीपवर दगडफेक केली. यात जीपचे नुकसान झाले. दगडफेकीनंतर महाराजांनी जीप परत अर्धमसला गावात आणली. घडलेल्या प्रकाराची माहिती ग्रामस्थांना दिली. तेव्हा ग्रामस्थांपैकी पाच ते सहा जण दुचाकीवर बसवून महाराजांना संरक्षण देत भाटेपुरीपर्यंत आले. मात्र या घटनेने व्यथित होऊन भगवंत महाराज पुरी यांनी शुक्रवारी सकाळी विष घेतले. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल

Post a comment

 
Top