0
मोतीहारी (बिहार) - चंपारण येथे हागणदारीमुक्‍त अभियानाअंतर्गत डीएम रमन कुमार यांनी जवळपास 25 किलोमीटरची यात्रा केली. यादरम्‍यान रस्‍त्‍यातील चौका-चौकात तसेच गावात लोकांशी संवाद साधून त्‍यांनी शौचालयाचे महत्‍त्‍व त्‍यांना पटवून दिले. सराठा गावात अनेकांच्‍या घरी भेटी देऊन तेथे निर्माणाधीन असलेल्‍या शौचालयांची त्‍यांनी पाहणीही केली. यावेळी त्‍यांनी साधनांची कमतरता असूनही शौचालय बांधत असल्‍याबद्दल लोकांचे कौतूकही केले.
रस्‍त्‍यात वराची गाडी थाबंली, पहिले अभिनंदन केले नंतर सुनावले
या प्रवासादरम्‍यान डीएमना रस्‍त्‍यात एका वराची मिरवणूक जात असल्‍याचे दिसले. त्‍यांनी वराची गाडी थांबवली व प्रथम विवाहाबद्दल त्‍याचे अभिनंदन केले. नंतर प्रश्‍न विचारला की, घरात शौचालय आहे? वराने नाही असे उत्‍तर दिले. त्‍यावर डीएम यांनी वराला सुनावले की, 'ज्‍या वधूला एवढ्या सन्‍मानासह तु घरी घेऊन चालला आहेस, त्‍याच वधूला रस्‍त्‍यावर नाईलाजाने आपले अंग उघडे करावे लागेल, हे किती शरमेचे आहे. आधी शौचालय बांध मग वधूला सोबत घेऊन जा'

येथे डीएम हागणदारीमुक्‍त अभियान राबवत आहेत.

  • DM inspected the houses for Toilets

Post a comment

 
Top