0
  • Supreme court also under suspicionमुंबई - सध्या देशातील सीबीआय, सर्वोच्च न्यायालय किंवा रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था ज्या पद्धतीने दहशतीखाली काम करत आहेत, ही परिस्थिती देशाची प्रशासकीय घडी विस्कटत असल्याचे द्योतक असल्याची चिंता पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी व्यक्त केली. अलिबाग येथे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. पटेल यांनी आपल्या संपूर्ण भाषणात भाजप आणि मोदींनाच लक्ष्य केले.


    मराठा सेवा संघ आणि संभाजी
    ब्रिगेडचे दोनदिवसीय राज्यस्तरीय नववे अधिवेशन अलिबाग येथील पीएनपी सभागृहात पार पडत आहे. उद््घाटनानंतर लगेचच हार्दिक पटेल यांनी अधिवेशनाला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘गुजरात मॉडेल’ म्हणजे भय, भूक आणि भ्रष्टाचार असल्याची बोचरी टीका केली. ज्याप्रमाणे मुंबई पाहायला आलेल्या माणसाला मराठवाड्यातल्या परिस्थितीची कल्पना नसते, त्याचप्रमाणे गुजरात मॉडेलही फक्त अहमदाबाद आणि बडोद्यापुरतेच मर्यादित आहे. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री ज्या सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात त्या भागातील तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. अगदी मुख्यमंत्र्यांच्या गावात आठवड्यातून फक्त दोनदा पाणी येते, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. मोदींच्या कारभारावरून आता लोकांचा विश्वास उडत चालला आहे. सीबीआय, सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँकेसारख्या संवैधानिक संस्थांची स्वायत्तता धोक्यात येत चालली अाहे.

    उद्या माेदी देशही विकतील 
    बड्या उद्योगपतींची धन करणाऱ्या मोदींनी देशातील जनतेला महागाई, शेतकऱ्यांना लाठीचार्ज आणि तरुणांना बेरोजगारीची भेट दिल्याचा टोला त्यांनी लगावला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी हा देश विकायला काढला असून २०१९ ला ते मतदारांना पण विकतील, असा आरोपही पटेल यांनी बोलताना या वेळी 

Post a Comment

 
Top