0
अमृतसर - ट्रॅकजवळ नीरजचा मृतदेह पडलेला होता.. त्याचे वडील सर्वांना बाजुला करत होते.. ते म्हणत होते - कोणी तरी लक्ष्य द्या, याला उचलून घेऊन चला, हा माझा मुलगा आहे.. त्यानंतर ते मोठ्याने रडायला लागले.. एक पीडित म्हणाले, मी मुलांना खेळणी आणि मिठाई घेऊन देतो सांगून घरातून आणले होते. रावण दहन पाहून त्यांना चांगले वाटेल असे मला वाटले होते. पण काही सेकंदात सर्व उध्वस्त झाले. मी तर वाचले पण माझे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले.


ही दृश्ये होती अपघात स्थळ असलेल्या जोडा फाटक येथील. रावणदहन कार्यक्रमादरम्यान येथे झालेल्या अपघातात 70 जण ठार झाले तर 142 जण जखमी झाले. मृतांमध्ये असलेल्या लहान मुलांपैकी बहुतांश मुलांचा मृत्यू चेंगलाचेंगरीमध्ये चिरडून झाला. 
नीरजचे वडील म्हणाले, एकच मुलगा होता, तोही आम्हाला सोडून गेला. कार्यक्रमासाठी त्याला येऊ दिसे नसते तर बरे झाले असते. मला काहीही माहिती नव्हते. घटनेबाबत समजले तेव्हा, त्याला शोधायला आलो. पण इथे त्याचा मृतदेह मिळाला. आता घरी जाऊन काय सांगू.

धावपळीत मुले आई वडिलांच्या हातून सुटले 
अपघातात ती लहान मुले दगावली त्यामध्ये रेल्वे खाली चिरडल्या गेलेल्यांपेक्षा चेंगरा चेंगरीत लोकांच्या पायाखाली चिरडल्या गेलेल्यांची संख्या जास्त आहे. गोंधळ सुरू झाला तेव्हा मुलांचे हात आई वडिलांच्या हातातून सुटले आणि लोक त्यांना चिरडत पुढे निघून गेले. चिमुरड्यांच्या लहान चपला, खेळणी, चॉकलेट रेल्वे ट्रॅकवर विखुरलेले होते. किती लहान मुले दगावली याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही, पण मृत मुलांचे वय 4 ते 13 वर्षांदरम्यान आहे.

ओळखही पटेना 
रेल्वेखाली चिरडल्या गेलेल्यांचे काही जणांचे चेहरे छिन्न विछिन्न झाले होते. चेहरा ओळखणे शक्य नव्हते. कोणी बहिणीचे नाव घेऊन ओरडत होते, तर कोणी त्यांच्या मुलांना शोधत होते. रुळाच्या दोन्ही बाजुला रक्ताने माखलेल्या मृतदेहांचा खच होता. कुठे कापलेले, हात पाय पडलेले दिसत होते. सगळीकडे आक्रोश होता आणि लोक आप्तेष्ठांना शोधत होते. 
स्थानिकांनी चादरी आणल्या 
मदतीसाठी स्थानिक लगेच सरसावले. त्यांनी मृतदेह झाकण्यासाठी आणि जखमींनी उचलण्यासाठी घरातून चादरी दिल्या. अनेक मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले होते. त्यामुळे पोलिसांना कोणता अवयव कोणाचा हेही समजत नव्हते.
Ground report after rail accident in Amritsar

Post a Comment

 
Top