0
  • नवी दिल्ली - 'मी टू' कॅम्पेनमध्ये अाता केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्यावरही लैंगिक शाेषणाचा अाराेप झाला अाहे. प्रिया रमाणी नामक महिलेने टि्वट केले की, अकबर यांनी मुलाखतीदरम्यान हाॅटेलच्या खाेलीत काही महिला पत्रकारांसाेबत अाक्षेपार्ह वर्तन केले. तर शुभा राहा नामक महिलेने टि्वट केले की '१९९५ मध्ये काेलकाता येथील हाॅटेलमध्ये अापल्यासाेबतही अकबर यांनी अाक्षेपार्ह वर्तन केले. त्याला विराेध केल्यामुळे त्या वेळी संपादक पदावर असलेल्या अकबर यांनी मला नाेकरी देण्यास नकार दिला हाेता. '

    दुसऱ्या महिला पत्रकाराने अाराेप केला की, अकबर हे हाॅटेलमध्ये नेऊन मुलाखती देत व महिलांना बिछाना व दारूची 'अाॅफर' देत.minister mj akbar accused of  sexual harassment

Post a Comment

 
Top