0
  • मुंबई- राम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारले असून दसऱ्यानंतर ते अयोध्येला जातील, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. या वेळी शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते.


    शिवसेना भवनात झालेल्या या भेटीत जन्मेजयशरणजी महाराज यांनी अयोध्या येथील राम मंदिराबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी न्यायालयीन प्रकरणासह अयोध्येतील वातावरणाबाबतही उद्धव यांना माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जन्मेजयशरण महाराज म्हणाले, शिवसेनेची ताकद आणि मदतीशिवाय राम मंदिर निर्माण होऊ शकत नाही. ठाकरे यांनी अयोध्येला यावे, असे निमंत्रण घेऊन आम्ही आलो. उद्धव यांनी निमंत्रण स्वीकारले. ते दसऱ्यानंतर अयोध्येला येऊन राम जन्मभूमीला भेट देतील. उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान राम जन्मभूमी मंदिर निर्माणाबाबत चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

    राम मंदिर न उभारणे हिंदूंचे दुर्दैव : संजय राऊत 
    संजय राऊत म्हणाले, राम जन्मभूमी मंदिर न्यासाच्या अध्यक्षांनी दिलेले आमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. येत्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्याची तारीख घोषित करतील. शिवसेना पक्षप्रमुखांच्या अयोध्या भेटीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. भाजप
    चे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. केंद्रात तर आता बहुमताचे सरकार आहे. अनेक प्रकरणांत अध्यादेश काढणाऱ्या भाजपला राम जन्मभूमी मंदिरासाठी अध्यादेश काढणे काय कठीण आहे, असा प्रश्न करत राऊत म्हणाले, रामाच्या नावावर सत्तेत आल्यानंतरही मंदिर उभारले जात नसेल तर ते या देशातील हिंदूंचे दुर्दैव असल्याचे राऊत यांनी या वेळी सांग

Post a comment

 
Top