- नवरात्रीमधील तृतीया तिथी (12 ऑक्टोबर, शुक्रवार)ला देवी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या देवीच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचा देदीप्यमान चंद्र विराजमान आहे. यामुळे या देवीला चंद्रघंटा म्हणतात. ही देवी दशभुजा आहे. ही देवी दुष्टांचा नाश करून भक्तांचे रक्षण करणारी आहे. त्यामुळे या देवीची उपासना करणारा पराक्रमी, निर्भय होतो. भक्ती व मुक्ती मिळवण्यासाठी या देवीची पूजा केली जाते.
पूजन विधी -
सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर चंद्रघंटा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. चौरंगावर चांदी, तांबे किंवा मातीचा कलश स्थापन करून त्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवा. त्यानंतर चौरंगावर श्रीगणेश, वरुण, नवग्रह, षोडश मातृका (16 देवी) ची स्थापना करावी. त्यानंतर व्रत, पूजांचा संकल्प घ्यावा.
वैदिक आणि सप्तशती मंत्राचा उच्चार करून चंद्रघंटासहित सर्व स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा करावी. यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य सूत्र, चंदन, रांगोळी, हळद, शेंदूर, दुर्वा, बिल्वपत्र, दागिने, फुलं-हार, सुगंधित द्रव्य, धूप-दीप, नैवेद्य, फळ, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजलि इ. गोष्टी कराव्यात.
ध्यान मंत्र
पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्रयं चन्द्रघण्टेति विश्रुता॥
देवी चंद्रघंटाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा... -
देवीच्या या स्वरूपात मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण केलेला आहे, म्हणून नाव चंद्रघंटा. दशभुजा म्हणजे दहा हातांत शस्त्रे वाहन सिंह असूनही चंद्रघंटा देवीचे स्वरूप शांतिदायक आणि कल्याणकारी आहे. युद्धासाठी सदैव सज्ज अशी मुद्रा असूनही भक्तांना अभय देणारी आहे. वाहन सिंह असल्याने या देवीचे उपासक पराक्रमी निर्भय होतात, असे म्हटले जाते. म्हणजे देवीची मुद्रा उग्र आहे, परंतु ती केवळ दुष्ट, असुर विध्वंसक शक्तीच्या नाशासाठी. सज्जन, भक्त यांच्यासाठी ती संरक्षक देवता आहे.
- जिव्हेवर सदैव माधुर्य विराजमान झालेले असावे. विनम्रतेने मनाला अपार शांतता लाभते. आंतरिक शांतता तुमच्या आत्मबलाची वृद्धी करते. विनम्र व्यक्तीचा आत्मविश्वास उत्तरोत्तर दृढ होतो. समोरच्या व्यक्तीच्या मनात विनम्र व्यक्तीबद्दल एक प्रकारचा विश्वास आपोआप निर्माण होतो. जसे अंगाला राख फासली प्रपंच सोडून रानावनात जाऊन राहिले म्हणजे वैराग्य येत नाही, तर त्यासाठी अधी मनावर नियंत्रण मिळवून आसक्ती नष्ट झाली पाहिजे; मग संसारात राहूनही विरागी राहता येते, तसे याही बाबतीत आहे. निर्भय असावे, पण उद्दाम, उद्धट असू नये. तसेच विनम्र असावे, पण लाचार असू नये, अशी शिकवण जगदंबेच्या या स्वरूपातून आपण घेतली पाहिजे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment