कोल्हापूर- एसटी बसने मोपेडला धडक देवून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर महिलेची सून गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सीपीआर चौकात हा अपघात झाला.
फुलाबाई बाबासो अस्वले (वय-55, रा. वडणगे, करवीर) असे मृत महिलेचे तर पपिता सरदार अस्वले (वय-25) असे जखमी सूनेचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी की, दुपारी 2च्या सुमारास मोपेडवरून सासू व सून कोल्हापूरहून वडणगेकडे जात होत्या. यावेळी सीपीआर चौकात एसटीने मोपेडला धडक दिली. यात फुलाबाई अस्वले यांचा जागेवरच मृत्यू झाला. पपिता अस्वले जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत फुलाबाई अस्वले या वडणगे येथील ग्रामीण रुग्णालयात नोकरीला होत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment