0



मुंबई : चंद्रशेखर माताडे
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून  राम मंदिराचा मुद्दा उपस्थित होण्याची  शक्यता गृहित धरून  शिवसेनेनेही आपल्या हिंदुत्वाच्या कार्डाला आणखी धार दिली आहे. मुंबईत शिवसेनेने जागोजागी पोस्टरवर हिंदुत्वाची वज्रमूठ दाखवत, एकप्रकारे आपला निवडणूक प्रचारच सुरू केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधींवर कारवाई झाली, तरी हा मुद्दा लावून धरणार्‍या शिवसेनेने आता तो अधिक टोकदार केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून कोणता आदेश शिवसैनिकांना मिळणार, याची राजकीय पातळीवर चर्चा आहे. राम मंदिराच्या प्रश्‍नावर भाजपपेक्षा शिवसेनेनेच आक्रमक भूमिका घेतली आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू करावे, अशी पक्षाची भूमिका जाहीर केल्यानंतर याप्रश्‍नी संबंधितांच्या गाठीभेटी कायम ठेवत, त्यांनी हा मुद्दा चांगलाच टोकदार केला आहे. 
राम मंदिर न्यासाच्या प्रमुखांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अयोध्येत जाऊन रामलल्ला मंदिराच्या पुजार्‍यांची घेतलेली भेट आणि दसर्‍यानंतर उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा या सगळ्या बाबींतून हे स्पष्ट झाले आहे

Post a Comment

 
Top