0
    • boy went to the class to kiss girl studentपाथर्डी- शाळाबाह्य मुलाने पैज जिंकण्यासाठी वर्गात जाऊन एका विद्यार्थिनीचे चुंबन घेतले. हा प्रकार नगर जिल्ह्यातील भालगाव (ता. पाथर्डी) येथे गुरुवारी सायंकाळी घडला. शुक्रवारी पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर मुख्याध्यापक तुकाराम म्हस्के यांनी पाेलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.


     गुरुवारी गावातील अाेट्यावर मुलांचे टाेळके बसले हाेते. त्यांच्यात वर्गात जाऊन मुलीचे चुंबन घेण्याची पैज लागली. यापैकी एका उनाड मुलाने वर्गात जात मुलामुलींसमोर एका मुलीचे जबरदस्तीने चुुंबन घेतले. काही
     विद्यार्थिनींनी हा प्रकार शिक्षक व मुख्याध्यापकांना सांगितला. त्यांनी पालकांच्या कानावर घातला. मात्र, मुलीची बदनामी नकाे म्हणून तक्रार द्यायला नकाे, असे पालकांनी सांगितल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे अाहे.
     दरम्यान, शुक्रवारी इतर पालकांनी अत्याचारग्रस्त मुलीच्या पालकाला धीर देत शाळेत अाणले व मुख्याध्यापकांना धारेवर धरले. शाळेच्या वेळेत गावातील कोणीही येईल मुलीची छेड काढेल, अशी मनमानी चालणार नाही. आपण काय करता? शाळेत हा प्रकार घडल्याने शाळेच्या वतीने पोलिसांत फिर्याद दाखल करा; अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा दिला. त्यानंतर मुख्याध्यापक पाेलिसात तक्रार देण्यास तयार झ
  गुरुवारी गावातील अाेट्यावर मुलांचे टाेळके बसले हाेते. त्यांच्यात वर्गात जाऊन मुलीचे चुंबन घेण्याची पैज लागली. यापैकी एका उनाड मुलाने वर्गात जात मुलामुलींसमोर एका मुलीचे जबरदस्तीने चुुंबन घेतले. काही विद्यार्थिनींनी हा प्रकार शिक्षक व मुख्याध्यापकांना सांगितला. त्यांनी पालकांच्या कानावर घातला. मात्र, मुलीची बदनामी नकाे म्हणून तक्रार द्यायला नकाे, असे पालकांनी सांगितल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे अाहे.
  दरम्यान, शुक्रवारी इतर पालकांनी अत्याचारग्रस्त मुलीच्या पालकाला धीर देत शाळेत अाणले व मुख्याध्यापकांना धारेवर धरले. शाळेच्या वेळेत गावातील कोणीही येईल मुलीची छेड काढेल, अशी मनमानी चालणार नाही. आपण काय करता? शाळेत हा प्रकार घडल्याने शाळेच्या वतीने पोलिसांत फिर्याद दाखल करा; अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा दिला. त्यानंतर मुख्याध्यापक पाेलिसात तक्रार देण्यास तयार झाले.

Post a comment

 
Top