0
मबई कांदिवली पश्चिमेकडील मिलाप पेट्रोल पंपावर शनिवारी सकाळी रिक्षामध्ये गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन रिक्षा चालक जखमी झाले असून त्यांना तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गरजेपेक्षा जास्त सिलेंडरमध्ये गॅस भरल्याने स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात तिघांच्या पायावर रिक्षाचे तुकडे उडून त्यांचे पाय भाजले आहेत.यातील दोघे किरकोळ जखमी असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर येथील तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
अनिल शिवराम मोरे (५७) , सोहेल कमाल अहमद शेख (५७), शैलेश कृपाशंकर तिवारी (२५) हे तिघे जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुले यांनी दिली.Cylinder explosion at petrol pump in Mumbai's Kandivali, three injured | कांदिवलीत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी

Post a Comment

 
Top