0
  • नाशिक- लाेकांवर राज्य करण्यासाठी नव्हे तर त्यांची सेवा करण्यासाठी पाेलिस अधिकारी झाले पाहिजे, महाराष्ट्र पाेलिस दलाची गाैरवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रलाेभनांना व दबावाला बळी न पडता कर्तव्य बजावण्याची अावश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


    महाराष्ट्र पोलिस प्रबाेधिनी नाशिक येथे प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक तुकडी ११५ च्या दीक्षांत संचलनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, दीपक केसरकर, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपस्थित हाेते.

    फडणवीस म्हणाले, काही अधिकाऱ्यांकडून अधिकारपदाचा दुरुपयाेग केला जाताे. यामुळे लाेकशाहीलाच धाेका पोहोचू शकताे. जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करण्याचे काम पाेलिस दलाने करणे अपेक्षित अाहे. सेवेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांनी देशसेवेचे ध्येय समोर ठेवून कार्य करावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्वाभिमान शिकवल्याने ते देशासाठी लढले. अधिकाऱ्यांनीदेखील कोणत्याही भय किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्याचे पालन करावे. गुन्हेगारांना जरब बसवताना संवेदना अाणि माणूसपण जपणे महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणात शिकलेल्या मूल्यांचा अंकुश मनावर ठेवून ही मूल्ये प्रशिक्षणापुरती मर्यादित न ठेवता कार्यक्षेत्रात उपयोगात आणण्याचे त्यांनी अावाहन केले. याप्रसंगी अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना, सहसंचालक संजय मोहिते, उपसंचालक नंदकुमार ठाकूर अादी उपस्थित हाेते.
    बुलडाण्याचे राजेश जवरेंना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' 

Post a comment

 
Top