नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिस आयुक्तांना प्राप्त झाला आहे.'नोव्हेंबर 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांना ठार करु', असे ईमेलमध्ये म्हटले आहे. अज्ञात व्यक्तीने हा ईमेल पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात माहिती दिली.
ईशान्य भारतातून आला ईमेल...
पंतप्रधानांना धमकी देणारा ईमेल ईशान्य भारतातील राज्यांमधून आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, ईमेल नेमका कोणी पाठवला आहे, यासंदर्भात अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही.
खास पथक करतेय तपास..
गुप्तचर यंत्रणांनीही याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी खास पथक तयार केले आहे.
Post a Comment