0
शिराढोण - पावसाअभावी शेती करपली, कृषिपूरक व्यवसायातही तोटा झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शिराढोण (ता. कळंब) येथील शेतकऱ्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार करून तिला ठार केले व नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (दि. १३) पहाटेच्या दरम्यान घडला. सकाळी वडील आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आईला सांगण्यासाठी मुलगा ती झोपलेल्या ठिकाणी गेला, मात्र तीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.


रामभाऊ गुलाब यादव (५०) यांची शिराढोण शिवारात तीन एकर शेतजमीन आहे. त्यांना तीन मुले असून त्यापैकी दोघांची लग्ने झालेली आहेत. रामभाऊ, त्यांची पत्नी सीताबाई यादव (४५) व पप्पू नावाचा विवाहित तसेच अविवाहित असलेला मुलगा अभिजित हे एकत्र राहत होते. शंकर यादव हा सर्वात मोठा मुलगा आपल्या पत्नीसह विभक्त राहत आहे.


रामाभाऊ यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतातच कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय सुरू केल्यापासून वर्षभर त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत होते. परंतु कालांतराने या व्यवसायात त्यांचा तोटा होत गेला. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना गवंडीकामही करावे लागत होते. परंतु वयानुसार त्यांना गवंडीकामही होत नव्हते. या वेळी पावसाने ओढ दिल्याने शेतीतूनही काहीच निघाले नाही. व्यवसायही मोडकळीस आला. उसनवारी व काही बँकेचे कर्ज कसे फेडायचे यामुळे रामभाऊ वैफल्यग्रस्त झाले हाेते.



नेहमीप्रमाणे रामभाऊ यांनी शुक्रवारी रात्री जेवण केले. नंतर पत्नीसह ते कुक्कुटपालनासाठी उभारलेल्या शेडमध्ये रात्री झोपण्यास गेले. मुलगा अभिजितने त्यांना शेडपर्यंत सोडले. त्यानंतर रामभाऊ यांनी अभिजितला घरी जाण्यास सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती Farmer did suicide after killing his Wife

Post a Comment

 
Top