मुंबई- विश्वकर्मा समाजातील २५ ते ३० महिला मंगळवारी पूजेला जाण्यापूर्वी एका विहिरीच्या कठड्यावर बसल्या हाेत्या. मात्र अचानक या विहिरीवरील स्लॅब काेसळल्याने त्यापैकी काही महिला व लहान मुले विहिरीत पडली. त्यापैकी दाेन महिला व एका तीनवर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर इतर १२ ते १५ जणींना वाचवण्यात यश अाले.
मुंबईतील विलेपार्ले भागातील रुईया बंगलाे परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उत्तर भारतीय विश्वकर्मा समाजातील महिला दरवर्षी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करतात. मंदिरात जाण्यापूर्वी या महिला विहिरीजवळ बसल्या असाव्यात. त्या विहिरीत पडल्याचे कळताच उपस्थित महिला व इतर लाेकांनी साड्या व अाेढण्या विहिरीत साेडून या महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात अाले. त्यांनी तातडीने महिलांना वर काढण्यासाठी प्रयत्न केले. माधवी विजय पांडे (४९), रेणू उदीलाल यादव (२०) व दिव्या (३) अशी मृतांची नावे अाहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment