0
 • News about Cannibal Tigerधामणगाव रेल्वे - मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर यांचा शुक्रवारी जीव घेतल्यानंतर दोन दिवसांपासून अंजनसिंगी परिसरात ठाण मांडून बसलेल्या वाघाने गावातील मोरेश्वर बाबाराव वाळके (वय ४५) या शेतमुजराचा बळी घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. नरभक्षक वाघ अंजनसिंगी परिसरात फिरत असल्याने शेतकरी व शेतमजुरांनी शेतात न जाण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान, वाघाला मारण्याची, नरभक्षक घोषित करण्याची परवानगी अद्यापही न मिळाल्यामुळे वाघाचा धुमाकूळ अनिश्चित झाला असल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. दरम्यान, तालुक्यातील नागापूर येथे बिबट्याने सोमवारी रात्री बकरी फस्त केल्याची घटनाही मंगळवारी उघडकीस आली.


  मंगरुळ दस्तगीर येथील राजेंद्र देविदास निमकर (वय ४८) या शेतकऱ्यांचा शुक्रवारी वाघाने बळी घेतला होता. त्यानंतर या वाघाने आपला मोर्चा अंजनसिंगीकडे वळवला. वन विभागाद्वारे शनिवारी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यानजीक वगार फस्त केली होती. सोमवारी शिदोडी येथे वासरावर हल्ला केला होता. दरम्यान सोमवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास बकऱ्यासा
     
  पिंजऱ्यापासून काही अंतरावरच वाळके यांचा बळी 
  शरद राठी यांच्या शेतानजीक असलेल्या नाल्याजवळ वनविभागाने पिजंरा ठेवला होता. दरम्यान या पिंजऱ्यापासून काही अंतरावरच वाळके यांचा वाघाने जीव घेतला. दरम्यान वाघाच्या दहशतीमुळे अनेक गावकऱ्यांनी वाळकेंना सायंकाळच्या सुमारासचारा आणण्यास न जाण्याचाही सल्ला दिला होता. परंतु वाळके यांनी तो जुमानला नाही.
  अंजनसिंगीवासीयांनी संपूर्ण रात्र काढली जागून 
  नरभक्षक वाघाचा संचार अंजनसिंगी परिसरात असल्याने दहशतीमुळे अंजनसिंगीसह परिसरातील गावातील नागरिकांनी रात्र जागून काढली. वाळके बेपत्ता झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. वाघाच्या भीतीने अंजनसिंगि परिसरातील अनेक नागरिक वाघाच्या दहशतीखाली जागरण करून रात्र काढत होते. सोमवारी रात्री अंजनसिंगी परिसरात वाघाचे आगमन झाल्याची माहिती वनविभागाने दिली असल्याने परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची जनजागृती करण्यात आलेली होती.
  नागापुरात बिबट्याने बकरी केली फस्त 
  धामणगाव रेल्वे : एकीकडे तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असताना देवगाव नागापूर परिसरात सोमवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने बकरी फस्त केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास बिबट्याने नागापुर गावात प्रवेश करून श्रीधर वरखड यांच्या घरी बांधलेल्या बकऱ्या वर हल्ला चढवून एक बकरी ठार केली. ही बकरी बिबट्याने ठार केल्याची खात्री वन विभागाने केली आहे. धाममनगाव तालुक्याचे वन संरक्षक ए. बी. दातीर यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असता बिबट्याचे पग मार्क व विष्ठा आढळून आली.

  मृतकाच्या नातेवाइकांना नोकरी देण्यासाठी पाठवणार प्रस्ताव 
  मृतकाच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात तब्बल पाच सात ठिय्या आंदोलन करून मृतकाच्या वारसांना नोकरी मिळण्याची मागणी केली. नरभक्षक वाघाने वन खात्याच्या हद्दी बाहेर शेतकऱ्यावर हल्ला चढविल्याने मंगरूळ दस्तगिर येथील मृतक राजेंद्र निमकर व अंजनसिंगी येथील मोरेश्वर वाळके यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून नोकरीत सामावून घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सस्नेह कणीचे यांनी सांगितले. तोपर्यंत तात्पुरता रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे लेखी आश्वासन मुख्य सचिव प्रवीण चव्हाण यांनी दिले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
  परिसरातील सहा गावांतील शाळांना सुटी 
  धामणगाव तालुक्यात वाघाचा वावर राहण्याची शक्यता असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याना वाघापासून धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तिवसा तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील कुऱ्हा दुरुगवाड़ा, आखतवाड,मार्डा,छिंडवाडी, 
  बोर्डा,भारवाडा,हतनापुर(हुसेनपूर),मूर्तिजापूर,कौंडण्यापूर या दहापैकी सहा गावातील शाळांना बुधवारी ( ता.२४) सुटीचे आदेश दिले आहेत.
  गतवर्षीही वरुडमध्ये एका महिलेचा गेला होता बळी 
  गेल्या वर्षी २ आॅक्टो. २०१७ रोजी वरुड तालुक्यातील एका महिलेवर वाघाने हल्ला करून ितला ठार केले होते. योगायोग म्हणजे वाघाने यंदाही आॅक्टोबर महिन्यातच धामणगांव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी येथील दोघांचा बळी घेतला आहे. आॅक्टोबर महिन्यातच या घटना का घडल्या यामागील शास्त्रीय कारण मात्र वन विभागाला सांगता आले नाही. वाघाच्या बंदोबस्तासाठी उपवनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या नेतृत्वात सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, वन परिक्षेत्र अधिकारी चांदूर रेल्वे अाशिष कोकाटे, वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शीघ्र बचाव पथक प्रयत्न करीत आहे.
  वाघ कॅमेऱ्यात कैद; पण पिंजऱ्यात नाही 
  वाघाच्या हल्ल्यात दोन जण ठार झाले असताना अद्यापही वाघाला जेरबंद करण्यात यश आले नाही.अंजनसिंगी व पिंपळखुटा परिसरात तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. पण पिंजऱ्यात वाघ अद्याप अडकला नाही. दरम्यान वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहे.

  वरोरापासून निघाला,तरीही मोकळाच 
  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून निघालेला हा नरभक्षक वाघ टप्प्याटप्प्याने मुक्काम करीत आता अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी पर्यंत पोहोचला आहे. परंतु एवढा लांब पल्ला गाठताना वनविभाग वाघाला जेरबंद का करू शकले नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
  वाळके यांचे हृदय व यकृत केले फस्त 
  नरभक्षक वाघाने मोरेश्वर वाळके यांचे यकृत, हृदय, फ्फूफूस, पोटातील सर्व भाग, गुप्तांग, माडीचा पूर्ण भाग फस्त केल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. शवविच्छेदन वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे व डॉ आशिष सालनकर यांनी केले.
  वाघाला मारण्याची परवानगी नाही 
  मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला मारण्याची तसेच नरभक्षक घोषित करण्याची परवानगी अद्याप केंद्र शासनाकडून िमळाली नाही. लवकरच परवानगी िमळेल. हरिश्चंद्र वाघमोडे, उपवनसंरक्षक.                  

Post a Comment

 
Top