0
 • यमुनानगर - हरियामाच्या यमुनानगर येथील रेल्वे स्टेशनवर 30 सप्टेंबरला पहाटे 3 वाजता चिमुरडीबरोबर राक्षसी क्रौर्य करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पिताच असल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या सावत्र वडिलांना अटक केली आहे. पोलिसांनी दावा केला की, आरोपीने त्या रात्री दारू प्यायली होती आणि नशेमध्येच त्याने चिमुरडीबरोबर दुष्कर्म केले आणि आणि नंतर खोटी कहाणी रचली.


  पोलिसांना सुरुवातीपासूनच होता संशय 
  जीआरपी एसपी धीरज कुमार यांनी सांगितले की, चिमुरडीच्या वडिलांवर पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. चौकशीत त्याने आरोप कबूलही केला. आरोपीला कोर्टात हजर करुन रिमांडवर घेतले जाणार आहे. सध्या या प्रकरणात मुलीच्या आईचाही समावेश होता का, याचा तपास सुरू आहे. आरोपीने यापूर्वीही चिमुरडीबरोबर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी पत्नी आणि इतर लोकांनी पाहून त्याची धुलाई केली होती. त्यावेळी त्याने माफी मागितली होती आणि पोलिसांना तक्रार दिली नव्हती.
  मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली तेव्हा केला वडिलांकडे इशारा 
  मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर पोलिसांनी तिचे समुपदेशन केले आणि त्यानंतर तिने सावत्र वडिलांकडे इशारा केला. तर रेल्वे स्टेशनवर ज्याठिकाणी आरोपीने मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत मिळाल्याचे म्हटले होते, त्याठिकाणी रक्ताचे डागही आढळळे नाहीत. ज्या रात्रीची घटना आहे असे सांगितले जात होते, त्या रात्री स्टेशनवर शेकडो लोक होते. पण कोणीही पोलिसांना अशी घटना घडल्याबाबत सांगितले नाही. त्याचवेळी मुलीचे सावत्र वडील वारंवार जबाब बदलत होते. त्यामुळे वडिलांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली तर आरोपीने गुन्हा कबूल केला. घटनेत आणखी अनेकांचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे.

  मुलीची अवस्था पाहून रात्रभर रडली होती आई 
  मुलीच्या आईने सांगतिले की, ती मुलीला शोधत होती तेव्हाच तिला मुलीने आवाज दिल्याचे ऐकू आले. ती पळत गेली तर मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली होती. तेवढे बोलून आई जोरात रडू लागली. त्या रात्री ती रात्रभर रडत होती.
  3 year old baby girl molestation case in yamunanagar

Post a Comment

 
Top