0
  • Udhav Thackeray visited at Shirdi, ahmednagarराहाता/ नगर - 'राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असे सरकार सांगते, मात्र शेतकऱ्यांच्या हातात तर छदामही पडला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी हा माेठा घाेटाळा अाहे,' अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजप सरकारवर केली. तसेच पक्षाचे नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी घाेटाळ्याविषयी सरकारला जाब विचारावा, अशी सूचनाही त्यांनी केली. जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवणे हा देशद्रोहच असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी भाजप नेत्यांवर केली.


    उद्धव ठाकरे रविवारी नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर अाले हाेते. सर्वप्रथम शिर्डीत येऊन त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर शिर्डी व नगरमध्ये अायाेजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बाेलत हाेते. केंद्राला जाब विचारण्यासाठी राज्यभर मेळावे घेणार असून त्याची सुरुवात शिर्डीतून झाली असल्याचेही यांनी जाहीर केले.

    अागामी निवडणूक प्रचारात अयाेध्येतील राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेच्या अजेंड्यावर राहणार असल्याचे संकेत उद्धव यांनी दसरा मेळाव्यात दिले हाेते. रविवारी नगरमध्ये सभेच्या व्यासपीठावरही श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्यात अाली हाेती. या मूर्तीचे पूजन करूनच ठाकरेंनी सभा सुरू केली.

    शेतकऱ्याचा सवाल; तुमचे खासदार अाहेत कुठे?
    शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लाेखंडे यांच्या कामाचे उद्धव ठाकरेंनी काैतुक केले. 'लाेखंडे सातत्याने माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात. यंदा त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवा,' असे अावाहन त्यांनी केले. तेवढ्यात एक शेतकरी उठून म्हणाला, 'साहेब, साडेचार वर्षांत ते संगमनेरच्या पठार भागाकडे फिरकलेच नाहीत....' त्यावर भांबावलेल्या ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्याला बाेलावून घेत त्याचे म्हणणे ऐकून घेतले.

Post a Comment

 
Top