तिरुवनंतपुरम - केरळमधील एका आश्रमावर हल्ला करून आग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या आश्रमाच्या प्रमुख महंतांनी सबरीमाला मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळेच हा हल्ला करण्यात आल्याचे समोर येत आहे. रात्री उशिरा करण्यात आलेल्या या जाळपोळीत आश्रमातील गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सबरीमाला येथील मंदिरात अकरा ते 50 वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांना प्रवेश बंदी ची शेकडो वर्षांची परंपरा सुप्रीम कोर्टाने मोडीत काढली होती. सर्व महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर याठिकाणी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. धर्म गुरू, मंदिराचे पुजारी आणि भाविकांनी याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. तिरवनंतपुरमच्या कुंदमंकदावू येथे आश्रम असलेल्या स्वामी संदीपानंद गिरी यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संदीपानंद गिरी यांना अनेक प्रकारच्या धमक्याही मिळाल्या होत्या.
संदीपानंद गिरी यांच्या आश्रमात रात्री अडीच वाजेच्या सुमारास काही हल्लेखोर घुसले आणि तोडफोड तसेच जाळपोळ केली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार यात आश्रमातील काही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यात एक ओमिनी, एक होंडा सीआरव्ही यांचा आग लावण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात गुन्हेगारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment