- मुंबई - सेक्श्युअल हॅरेशमेंट प्रकरणी तनुश्री दत्ताने नाना पाटेकरच्या विरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तनुश्रीने नानाशिवाय कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि फिल्म प्रोड्यपसर सामी सिद्धीकी, डायरेक्टर राकेश सारंग आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) च्या काही कार्यकर्त्यांची नावेही घेतली आहेत. तनुश्रीने 354, 354 A, 34 आणि IPCच्या कलम 509 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
तनुश्रीने तक्रारीत म्हटले आहे की, मी 14 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये अॅक्ट्रेस म्हणून काम करत आहे. 23 ते 26 मार्च, 2008 दरम्यान मी गोरेगाव वेस्टच्या फिल्मिस्तान स्टुडियोमध्ये 'हॉर्न ओके प्लीज' च्या गाण्याची शुटिंग करत होते. चित्रपटाचे कोरिओग्राफर गणेश आचार्य होते. जर डायरेक्टर राकेश सारंग, प्रोड्युसर सामी सिद्दीकी आणि अॅक्टर नाना पाटेकर होते. हे गाणे सोलो साँग होते. ते फक्त माझ्यावर चित्रित केले जाणार होते. नाना पाटेकर यांची या गाण्यात फक्त एक लाइन होती आणि ते रिहर्सलचा पार्ट नव्हते.
डान्स शिकण्याच्या बहाण्याने मिठी मारली..
शुटिंगच्या पूर्वीच मी गणेश आचार्य यांना स्पष्ट केले होते की, मी कोणतेही व्हल्गर किंवा अनकम्फर्टेबरल स्टेप्स करणार नाही. शुटिंगच्या चौथ्या दिवशी म्हणजे, 26 मार्चला माझ्याबाबत नाना पाटेकरचे बिहेवियर विचित्र होते. सेटवर त्यांचे काम नसतानाही ते त्याठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मला डान्स शिकवण्याच्या बहाण्याने मिठी मारली होती. त्यांनी गरज नसतानाही मला स्पर्श करायला सुरुवात केली तेव्ही मी भांबावून गेले. मला वाटले की नाना माझ्याबरोबर छेडछाड करत आहेत.
मार्ग काढण्याऐवजी कोरिओग्राफरने गाण्यात टाकले इंटिमेट सीन
मी कोरिओग्राफर, प्रोड्युसर आणि डायरेक्टरला याबाबत तक्रार केली. ते काहीतरी मार्ग काढतील आणि सर्वकाही सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. पण उलट कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी काही इंटिमेट स्टेप गाण्यात टाकल्या, त्याता नानाला मला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा होता. त्यानंतर शुटिंगच्या वेळी नानाने मला अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. विरोध केला तर माझ्यावर दबाव टाकण्यात आला. निर्मात्यांनी बदनाम करण्याची धमकी दिली. अगदी सेटवरही सर्व नानाची बाजू घेत होते. हे सर्व नानाच्या इशाऱ्यावर होत होते.
गुंडांकरवी हल्ला केला
मी याबाबत आई वडील आणि मॅनेजरशी बोलले. पण प्रोड्युसरने काहीही चुकीचे झाले नाही असे म्हटले. माझ्याकडे स्टुडिओ सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रस्त्यात नाना पाटेकरने मनसेचे गुंडे बोलावून माझ्या कारवर हल्ला केला. पण पोलिसांच्या मदतीने मी तिथून निसटले. त्यानंतर मी पोलिसांत जाऊन तक्रार दिली आणि जबाब नोंदवला. पण माझी तक्रार गांभीर्याने घेण्यात आली नाही. मी जे काही सांगितले ते काढून टाकण्यात आले. या घटनेने मला धक्का बसला. मानसिक स्थिती बिघडल्याने माझ्या कामावर परिणाम झाला आणि त्यामुळे नुकसान सहन करावे लागले.
शेतकऱ्यांच्या विधवांनी पोस्टर जाळून केला विरोध
तनुश्रीच्या तक्रारीनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज तिच्या सपोर्टमध्ये आले आहेत. दुसरीकडे यवतमाळमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी तनुश्रीचे पोस्टर जाळून विरोध नोंदवला. तनुश्रीचे आरोप बिनबुडाचे असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात दुष्काळादरम्यान जेव्हा त्यांच्या पतींनी आत्महत्या केली तेव्हा नाना पाटेकरांनी त्यांची खूप मदत केली होती, असे त्यांचे म्हणणे आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment