0
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आज मंगळवारी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे विमाने उड्डाणे लांबणार आहेत. याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
विमानतळाच्या मुख्य आणि मध्यम धावपट्टीची (रनवे) दुरुस्ती केली जात आहे. यामुळे सायंकाळी ५ ते ७.३० च्या दरम्यानच्या विमान उड्डाणांना उशीरा होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरयोय होऊ शकते.
विमानतळ सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने या वेळेतील विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याचा परिणाम या वेळेत रोज होणाऱ्या ३०० विमान वाहतुकीवर होणार आहे. विमानतळावर रोज सुमारे १ हजार विमानांची वाहतूक होते.  
विमानतळ सहा तासांसाठी बंद राहणार असल्याने विमान उड्डाणांच्या वेळापत्रकात केलेला बदल, तसेच रद्द केलेली उड्डाणे आदी माहिती घेण्यासाठी प्रवाशांनी एअर इंडियाच्या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन एअर इंडियाने ट्वीटरद्वारे केले आहे. 

Post a Comment

 
Top