0
  • मुंबई/काेल्हापूर- कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात ताेकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश न देण्याचा निर्णय पश्चिम देवस्थान समितीने घेतला अाहे. मात्र, त्यावरून आता वादविवाद सुरू झाले आहेत. हा निर्णय देवस्थान समितीने नवरात्रोत्सवापूर्वी मागे घ्यावा; अन्यथा समिती सदस्यांना चोप देऊ, असा धमकीवजा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. तर, मंदिर व्यवस्थापनाने मात्र आपण निर्णयावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली आहे.


    'तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना अडवून मंदिरात न जाण्याची विनंती आम्ही करू तसेच ते कपडे बदलण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था केली जाईल', असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे.

    मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी लढा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या निर्णयावरून भारतीय जनता पक्षावरही आरोपाची राळ उठवली आहे. 'कोल्हापूर देवस्थानचे अध्यक्ष हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजप स्वत: पुढे येऊन अशाप्रकारचा निर्णय घेऊ शकत नसल्याने त्यांच्याकडून समितीचा आधार घेतला जात आहे. मंदिरात येणाऱ्या कोणत्याही भाविकाच्या कपड्यांवरून त्याची भक्ती ठरवली जाऊ नये. आमचा या निर्णयाला ठाम विरोध आहे. महिला भाविकांना साडी घालून मंदिरात प्रवेश देणे म्हणजे एक प्रकारचा फतवाच अाहे,' असा आरोपही देसाई यांनी केला आहे.

    लोकांच्या सूचनेवरून निर्णय : समिती अध्यक्ष                    
    मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी योग्य पोशाख असावा, अशा प्रकारच्या अनेक सूचना आम्हाला देशभरातून पत्र आणि ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त झाल्या. शिवाय, समितीतील दोन महिला सदस्यांनीही तोकड्या कपड्यांत मंदिरात बंदीवरील निर्णय मान्य करून तो मंजूर केला होता. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी योग्य कपड्यांतच यावे. कुणी तोकडे कपडे घालून आल्यास आम्ही त्यांच्यासाठी चेंजिंग रूमची व्यवस्थाही करू, असे समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटल

Post a Comment

 
Top