0



मुंबई:विशेष प्रतिनिधी
अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या इमेजवर काही प्रमाणात डाग लागला असून, कायद्याच्या कसोटीवर निर्दोषत्व सिद्ध करण्याची नाना यांना यापुढे संधी असणार आहे. मात्र, येत्या लोकसभा निवडणुकीत नाना पाटेकर यांनीच लोकसभा लढवावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या  सत्ताधारी भाजपाच्या एका गटाकडून नानाचे नाव आता प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आले होते.  तनुश्री वादामुळे नानांच्या पॉलिटिकल एन्ट्रीवर आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याची  विश्‍वसनीय माहिती सूत्रांकडून समजते

Post a Comment

 
Top