0
  • fashion designer sunita singh murdered by her model sonमुंबई - ओशिवरा परिसरात एका नामवंत फॅशन डिझायनरची तिच्या मुलाने हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनीता सिंह (४५) असे मृत फॅशन डिझायनरचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी मुलगा लक्ष्यला पोलिसांनी अटक केली आहे. पार्टीनंतर लक्ष्यने नशेत आईला बेदम मारहाण करून तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवले होते. मात्र, सकाळी बाथरूम उघडल्यावर आईचा मृत्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मुंबईतील पॉश लोखंडवालामधील क्रॉस गेट इमारतीच्या ए विंगमधील ३०१ फ्लॅटमध्ये सुनीता, लक्ष्य, त्याची प्रेयसी आणि त्याचा मित्र


    निखिल मध्यरात्रीपर्यंत पार्टी करत होते. पार्टीनंतर दारूच्या नशेत आई आणि मुलामध्ये कौटुंबिक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. दारूच्या नशेत असलेल्या लक्ष्यने आईला बेदम मारहाण केली. त्यानंतर बाथरूममध्ये तिला ढकलून दार बंद कले. धक्का दिल्याने बाथरूमधील नळावर सुनीता यांचे डोके आदळल्याने ती गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यान तिचा जागीच मृत्यू झाला.

Post a comment

 
Top