0
 • news about congress Mla radhakrushn avikheऔरंगाबाद - मराठवाड्यास पाणी देण्यास विरोध करणारे विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंगळवारी (३० ऑक्टोबर) केंब्रिज शाळा चौकात शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चोर का म्हणता, असा जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. आमदार अब्दुल सत्तार यांनी तर कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. तर माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी चक्क विखेंची पाठराखण केली.


  विखे पाटील हे डॉ. काळे यांच्या घरी आल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी युवक आघाडीचे कार्यकर्ते तेथे दुपारी साडेतीन वाजता दाखल झाले. घरातून बाहेर पडत असताना माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळी हजर होते. विद्यार्थ्यांनी भांगे यांच्या नेतृत्वाखाली विखे यांच्याशी पाण्याच्या
  डॉ. काळेंकडूून विखे पाटलांची पाठराखण 
  मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे पाणी रोखणारे, मराठवाड्यातील
  शेतकऱ्यांना चोर म्हणणाऱ्या विखे पाटील यांचा मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून माजी आमदार डॉ. कल्याण काळे निषेध करतील. त्यांना जाब विचारतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी नेमके काय केले, याविषयी दिव्य मराठी प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी विखेंची पाठराखण तर केलीच शिवाय त्यांच्या मराठवाडाविरोधी भूमिकेचा निषेध नोंदवण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. विखे माझे पाहुणे आहेत. त्यांच्याशी असे वागणे बरे नाही, असेही ते म्हणाले.

  शेतकऱ्यांचा आक्रमक अवतार पाहून विखे गाडीबाहेर आलेच नाहीत 
  आंदोलकांचा आक्रमक अवतार पाहून विखे पाटील गाडीतून बाहेर आलेच नाही. ते पाहून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेत संवाद साधला. ते म्हणाले की, तुमच्या भावना योग्यच आहेत. त्याविषयी मी तातडीने विखे पाटील यांच्याशी बोलतो. त्यामुळे अप्पासाहेब निर्मळ, अप्पासाहेब पाचपुते, विलास लिपाणे, विलास निर्मळ, किशोर सदावर्ते, स्वप्निल आगलावे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी माघार घेतली.

  आंदोलकांनी विचारला जाब : मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना चोर कसे म्हणता? 
  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना घेराव घातला.

  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, धक्काबुक्की चुकीची 
  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी डॉ. काळे यांच्या घरात वरच्या मजल्यावर असल्याने खाली विखे पाटील आणि आंदोलकांत नेमके काय झाले ते मला माहिती नाही. फक्त घोषणांचा आवाज मला ऐकू येत होता. आंदोलकांशी आमदार सत्तार यांनी धक्काबुक्की केली की नाही, हेही मला नेमके माहिती नाही. पण कोणीही कोणालाही अशी धक्काबुक्की केली असल्यास त्याचे समर्थन होऊच शकत नाही. असे काही घडले असेल तर ते चुकीचे आहे. 
  २ दिव्य मराठीचा प्रश्न : मराठवाड्याचे पाणी रोखणारे विखे तुमचे पाहुणे कसे असू शकतात? 
  डॉ. कल्याण काळे : माझ्या घरी कोण पाहुणे म्हणून यावेत, हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे. पाहुण्यांशी असे वागणे बरे नाही.

  सत्तारांचा निषेध 
  राष्ट्रवादीच्या युवकांनी सत्तार यांचा निषेध केला. भांगे म्हणाले, सत्तार जिल्ह्याचे आमदार असल्याने त्यांनी आमची भेट विखे यांच्याशी घालून द्यायला हवी होती. त्यांनी मराठवाड्याच्या बाजुने उभे राहायला हवे होते. परंतु त्यांनी आमच्यावरच दादागिरी केली. सत्तेसाठी ही मंडळी अशी वागत अाहेत. मराठवाड्याला पाणी नाही मिळाले तरी चालेल पण आपले राजकारण चालले पाहिजे, असा त्यांचा हेतू असल्याचेही ते म्हणाले. जालना येथून औरंगाबादकडे येत असताना विखे पाटील यांना जायकवाडी पाणी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी केंब्रिज शाळेसमोरील चौकात रोखले. आणि काळे झेंडे दाखवत राधाकृष्ण विखे पाटील हाय हाय पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी केली. त्यात गंगापूर मुद्द्यावरून बोलण्यास सुरुवात केली. यास सत्तार यांनी विरोध केला आणि नंतर बाचाबाची झाली आणि नंतर थेट सत्तार यांनी धक्काबुक्की केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. धक्काबुक्की करून विखेंना घेऊन सत्तार तेथून फुलंब्रीला निघून गेले. या आंदोलनात भांगे याच्यासमवेत विद्यार्थी आघाडी अध्यक्ष मयूर सोनवणे, युवक कार्याध्यक्ष शेख कय्युम अहेमद, डॉ. कपिल झोटिंग, अक्षय पाटील, कैलास कोंटे पाटील, संदीप जाधव, सौरभ मेहता, शरद पवार, विजय वरकड, शहारूख बागवान, सुनील राऊतराय आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

 
Top