0
 • youth's Suicide case in parbhani
  वसमत रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये शहरातील धार रोडवरील खंडोबा बाजार परिसरातील साई कॉर्नर येथील रहिवासी सचिन मिटकरी याने फॅनच्या कडीला हातरुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या फ्लॅटमध्ये त्याचे दोन ते तीन मित्र वास्तव्यास असतात. रविवारी सचिन हा या मित्राकडे आला होता. मित्र बाहेर गेल्यानंतर त्याने गळफास घेतला. मित्र घरी परतल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने नवा मोंढा पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी धावले. त्याच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट आढळली. त्यातील मजकुरानुसार एक महिला त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करीत होती. त्यासाठी तिने त्याला बदनामी करण्याची धमकी ही दिली होती. तिच्या या जाचास कंटाळून आपण आत्महत्या केल्याचे सचिनने नमूद केले. त्यावरून नीलेश नामदेव मिटकरी याने दिलेल्या फिर्यादीवरून संबंंधित महिलेवर नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
  सचिनवर ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा 
  या प्रकरणाचा संबंध सचिन मिटकरीवर दाखल बलात्काराच्या गुन्ह्याशी असल्याचे तपासात उघड झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी(दि.११) त्याच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराची तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. सचिन मिटकरी याने २०१४ पासून ते जून २०१८ या कालावधीत वेळोवेळी जबरीने शारीरिक संबंध ठेवले. लग्न करण्यास नकार देऊन धमकी दिल्याचे त्या महिलेने तक्रारी म्हटले होते. या तक्रारीवरून तकलम ३७६ नुसार मिटकरीवर ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळीच गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास फौजदार उदय सावंत हे करीत आहेत.
  तीन दिवसांनंतर संपवले आयुष्य 
  बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तीनच दिवसांनी सचिन मिटकरी याने मित्राच्या फ्लॅटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात संबंंधित महिलेनेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करीत बदनामीची धमकी दिल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्याच्या आत्महत्येने या प्रकरणाला वेगळेच वळण। 

Post a Comment

 
Top